लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका उच्च माध्यमिक शाळेला कायमस्वरूपी मान्यता देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना रवींद्र पवार (४५) या ठाणे जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित शाळेला कायमस्वरूपी मान्यता देण्यासाठी पवार याने या शाळेच्या प्रतिनिधीकडे ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार १६ डिसेंबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पवार याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या युनिटने सापळा रचून ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रसवंतीच्या दुकानात शाळेच्या प्रतिनिधीकडून ३० हजारांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या लिपिकाला ३० हजारांची लाच स्वीकारताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:36 PM
उच्च माध्यमिक शाळेला कायमस्वरूपी मान्यता देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे जिल्हा परिषदेचा कनिष्ठ लिपिक रवींद्र पवार (४५) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.
ठळक मुद्देठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई