ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) सेवेतील २९८ प्राथमिक शिक्षकांना नियमित वरिष्ठ वेतनश्रेणी व वर्षानुवर्षे तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या २० टक्क्यांप्रमाणे निवडश्रेणी मंजूर करण्याचा लाभ १८९ निवृत्त शिक्षकांना मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने शनिवारी घेतला. यामुळे जिल्हह्यातील प्राथमिक शिक्षक व सेवा निवृत्त शिक्षकांनी दिवाळी साजरी करीत आनंदोत्सव साजरा केला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाच्या अध्यादेशास अनुसरून कर्मचाऱ्यांप्रमाणेच या प्राथमिक शिक्षकांची काळजी करून वरिष्ठ वेतन श्रेणी व २० टक्के निवडश्रेणीचा आर्थिक लाभ सेवानिवृत्त शिक्षकाना प्राप्त करून दिल्या बद्दल अध्यक्षा दीपाली पाटील व उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांचे कौतूक करून शिक्षकांसह लाभ झालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शिक्षकांप्रमाणेचे गुरूवारी प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना करून देण्यात आला. तर पदोन्नती दहा जणांची करण्यात आली. याशिवाय ३० वर्षे सेवा झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांचे वैयक्तीक माहितीचा लेखाजोखा तपासण्यासाठी त्याचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश जि.प.ने जारी केले आहेत तर शनिवारी शिक्षण विभागाचे अपदवीधर, पदवीधर प्राथमिक शिक्षक पदावरील शिक्षकांना १२ वर्षे नियमित सेवेनंतर साखळीतील वरच्या पदांची वेतनश्रेणी दिली जाते. यानुसार राज्य सरकारने अध्यादेश काढून पात्र शिक्षकाना त्याचा लाभ देण्याचे मार्गदर्शन केले आहे. शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी शासन आदेशास अनुसरून अंमलबजावणी करीत २९८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. तर सेवा निवृत्त शिक्षकांनादेखील २० टक्के निवडश्रेणीचा लाभ १८९ सेवानिवृत्त शिक्षकांना करून दिला. गेल्या काही वर्षांपासून केवळ तांत्रिक कारणांमुळे १८९ निवृत्त शिक्षकांची निवडश्रेणी रखडली होती. आता त्यांना या निवडश्रेणीचा लाभ मिळाल्यामुळे शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ४८७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ; जिल्हह्यातील शिक्षकांमध्ये जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 6:37 PM
शिक्षकांप्रमाणेचे गुरूवारी प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना करून देण्यात आला. तर पदोन्नती दहा जणांची करण्यात आली. याशिवाय ३० वर्षे सेवा झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांचे वैयक्तीक माहितीचा लेखाजोखा तपासण्यासाठी त्याचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश जि.प.ने जारी केले आहेत
ठळक मुद्दे२९८ प्राथमिक शिक्षकांना नियमित वरिष्ठ वेतनश्रेणी तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या २० टक्क्यांप्रमाणे निवडश्रेणी मंजूर करण्याचा लाभ १८९ निवृत्त शिक्षकांनावरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना