ठाणे - जिल्हा परिषदेचा 101 कोटी 79 लाखांचा मूळ अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला आहे. गतवर्षापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात 35 कोटींची वाढ झाली आहे. 2018-19 चा मूळ अर्थसंकल्प 64 कोटी 99 लाख आणि 2018-19 सुधारित अर्थसंकल्प 78 कोटी 54 लाख 50 हजार असा 101 कोटी 79 लाखांचा मूळ अर्थसंकल्प गुरुवारी (28 फेब्रुवारी) अर्थ समितीचे सभापती सुभाष पवार यांनी मांडला.
अर्थसंकल्पात अपंगांसाठी तीन चाकी स्कूटी ही नवीन योजनेसह शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत याठिकाणी योजना समाविष्ट केली आहे. याचदरम्यान विरोधी नेते कैलास जाधव यांनी कृषी विभागासाठी 5 कोटींची वाढीव तरतूद करावी अशी मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, मुख्यकारी अधिकारी एच एस सोनावणे उपस्थित होते.