ठाणे : शहरातील ऐतिहासिक, ब्रिटीश कालीन कन्या शाळेची पटसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे ही शाळा बी.जे. हायस्कूलमध्ये समाविष्ठ करून मुलींना शिक्षण दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या शाळेकडे लक्ष देऊन पटसंख्या वाढवणाचे सुताेवाच मुख्य कार्यकारी अधिकारी राेहन घुगे यांनी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेचे सीईओ पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त हाेते. हा पदभार स्विकारल्यानंतर सीईओंनी सदिच्छा भेट घेण्यासाठी आज पत्रकार परिषद धेतली. त्यात कन्या शाळेच्या विषयावर चर्चा झाली. ब्रिटीश कालीन कन्या शाळेची पटसंख्या वाढवून तिची भरभराट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सीईओ यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाजवळ असलेली ही कन्या शाळा पटसंख्ये अभावी बी.जे. हायस्कूलमध्ये समाविष्ठ करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागाातील शाळांची पटसंख्या वाढवण्यात आल्याचा गवगवा करणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाला जवळच्या कन्या शाळेची पटसंख्या वाढवता आली नाही, याकडे सीईओ यांचे लक्ष वेधले असता या कन्या शाळेची पटसंख्या नक्कीच वाढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात आधीच खासगी शाळांचे पेव फुटले आहे. त्यातील महागड्या शिक्षणाची संधी शहरातील चाळ्या, झाेपडपट्टीत राहणाऱ्या मुलींना मिळणार नाही. पण जिल्हा परिषदेच्या या कन्या शाळेत शिक्षणाची उत्तम संधी असतानाही पटसंख्ये अभावी ही शाळा शेवटच्या घटका माेजत आहे. शहरातील या शाळेला पुनर्जिवीत करण्याची गरज पत्रकारांनी व्यक्त करून ऐतिहासिक ठेवा जिवीत ठेवण्याची अपेक्षा सीईओ यांच्याकडे करण्यात आली. त्यास अनुसरून त्यांनी पटसंख्या वाढणार असल्याचे सुताेवाच केले. वर्घा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून तृतिय क्रमांकावर आणल्यामुळे सीईओ यांना केंद्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासअ नुसरून येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेला पुनर्जिवीत करण्याची अपेक्षा त्यांच्याकडे करण्यात आली. त्यास त्यांनी सहमती दर्शवली.