ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेमार्फत श्रीराम व्यायाम शाळा, ठाणे येथे फर्न, ऑर्किड आणि ब्रोमलाईड यांच्या लागवडीचे तंत्र या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या विषयातील तज्ञ् नंदन कलबाग ( उद्यानतज्ञ ) यांनी हि कार्यशाळा घेतली: कार्यशाळेच्या सुरवातीला डॉ. मानसी जोशी ( कोषाध्यक्ष , पर्यावरण दक्षता मंडळ) यांनी संस्थेची थोडक्यात माहिती करून दिली त्यानंतर चित्रा म्हस्के ह्यांनी तज्ञाची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचा सुरवातीला एकंदरीत बागकामाबाबत कलबाग यांनी माहिती सांगून बागकामातील आधुनिक पद्धती बाबत उदा. कोकेडामा माती विरहित शेती पद्धती पेक्षा थोड्या महाग पडतात असे सांगितले. सुरवातीला कलबाग यांनी विविध फर्न ची माहिती देऊन तुम्ही मॉप वापरून फर्न वाढूं शकतात. शक्यतो फर्न प्लॅस्टिकच्या कुंडीत न वाढवता विविध साधने वापरून उदा. बांबू, नारळाची करवंटी शहाळे आणि नायलॉन पासून बनवलेले हँगिंग फर्न वाढवण्यासाठी करू शकतात. या हंगरचे वजन असून अत्यंत टिकाऊ असतात. कधी हि हँगिंग बास्केट करताना ओघळून वाढणाऱ्या व मऊ बुध्याच्या वनस्पती लावाव्यात. ऑर्किड ना मराठीत आमरी असे म्हणतात. काही ऑर्किड मातीत वाढतात तर काही मातीशिवाय वाढतात. मातीशिवाय वाढणाऱ्या ऑर्किड्स ना एपिफाईट म्हणतात. यांची फुले अतिशय सुंदर असून बाजारात अत्यंत मागणी आहे. बहुतेक ऑर्किड्स ना ऊन सोसवत नाही . त्यांना सकाळचे किंवा संध्याकाळचे ऊन मानवते. म्हणून त्यांची शेती करताना शेड नेटचा सर्सास वापर करतात. Rhynchostylis restusa, मराठीमध्ये त्याला सीतेची वेणी असे म्हटले जाते. या ऑर्किडल ना मे महिन्यात फुले येतात. कधीही ऑर्किड घेताना फुले न पाहता त्याची मुळे व्यवस्थित आहेत ना हे बघावे आणि मगच विकत घ्यावी. dendrobium , Vanda, Dancing Doll यासारख्या ऑर्किड ना आपल्याकडे फुले हमखास येतात. सर्व नेचे अपुष्प वनस्पती असतात, म्हणजे त्यांना फुले येत नाही. नेचे या वनस्पतीचा पानाच्या मागे स्पोअर असतात जर ती ओलसर जागी पडली तर त्यापासून नवीन रोपे उगवतात fig leaf fern ,birds nest fern, stag horn fern, अशा अनेक नेचांच्या जाती आपल्याकडे सापडतात. ब्रोमेलियाड म्हणजे अननस कुळात येणारी झाडे. त्यांची पाने विविध रंगांत असतात त्यामुळे त्या झाडांना बाजारात मागणी आहे. एकदा ब्रोमेलिआड्स ना फुले येऊन गेली ती झाडे मरतात. स्पॅनिश बॉस, एअर प्लांट्स हि थिलाड़सिया या प्रजातीच्या वनस्पती आपल्याकडील नसून दक्षिण अमेरिकेत ह्या कुळाचे मूळ स्थान आहे. या झाडांच्या पानाच्या पोकळीत पाणी साचलेले असते. कारण या झाडांच्या मुळांमध्ये पाणी शोषण्याची क्षमता असली तरी पानाच्या बुंध्याच्या मध्यभागी असलेल्या पोकळीतून पाणी शोसून घेतले जाते. कलबाग यांनी हँगिंग, ऑर्किड, नेचे, ब्रोमेलियाड याची सादरीकरणातून माहिती करून देऊन त्यांचे नवीन रोप कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक सर्वांना करून दाखवले. त्यानंतर पौर्णिमा शिरगावकर यांनी आभार मानून हा कार्यक्रम संपला असे जाहीर केले.