ठाणे : स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे निसर्गचक्र ातील योगदान व त्यांचा अधिवास वाचवण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रयत्न याबाबत सामान्यजनांत जागरूकता निर्माण व्हावी ,यासाठी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून शनिवारी ठाणेकर धावले. फ्लेमिंगो हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी असल्याने येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे एक धाव फ्लेमिंगोसाठी याअंतर्गत जनजागृती करण्यात आली. यात ओमकार डोंगरे हे २१ किमी धावले.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर हे किनारपट्टीचे प्रदेश असल्यामुळे येथे विपुल प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचा वास असतो. काही वर्षांत झपाट्याने कांदळवन आणि पाणथळ जागांचा फार मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी ºहास केला गेला. मानवी हस्तक्षेपामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास झपाट्याने नष्ट होत आहेत. दरवर्षी १० आॅक्टोबर यादिवशी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे रन फॉर फ्लेमिंगोसाठीला पाठिंबा देत सुमारे २० ठाणेकर धावले. यात कीर्तीचे मॅरेथॉनपटू डॉ. महेश बेडेकर हे टीमचे कप्तान होते. कोरोनावर मात करून आलेले येऊर परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पवार विशेष निमंत्रित म्हणून सहभागी झाले होते. येऊर येथील आदिवासी, ठाण्यातील भूमिपुत्र आगरी कोळी बांधव व पर्यावरणप्रेमी या धावमोहिमेमध्ये सामील झाले होते. ठाणे खाडीवर स्थित फ्लेमिंगो अभयारण्य याबद्दल येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटीच्या प्राध्यापिका क्लारा कोरिया यांनी सर्व सहभागी धावपटूंना फ्लेमिंगो अभयारण्याबद्दल व इतर स्थलांतरित पक्ष्यांबद्दल माहिती दिली.पर्यावरणरक्षणाचे आवाहनपर्यावरण दक्षता मंडळाच्या सुरभी वालावलकर यांनी खाडीकिनाऱ्यांच्या स्वच्छतेबद्दल ते करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रोहित जोशी यांनी कांदळवन आणि पाणथळ जागा वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटसारख्या विनाशकारी प्रकल्पांना प्रखर विरोध करून पर्यावरणरक्षण करण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले.