शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

ठाणेकरांना आठ दिवस मिळणार केवळ निम्मे पाणी; झोनिंग पद्धतीने होणार पाण्याचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 4:51 PM

भातसात तांत्रिक बिघाड 

ठाणे : भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील दोन दिवस ठाणे  शहराला ५० टक्के कमी पाणीपुरवठा होणार होता. परंतु, या कामासाठी आता आठ दिवसाचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे सतत आठ दिवस ठाणेकरांचे पाण्यापासून हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाने स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत उपलब्ध होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे झोनिंग करून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागणार असून, तोपर्यंत ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून दररोज २०० ऐवजी १०० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेतून ठाणे शहर, घोडबंदर परिसर व कळव्यात पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे ठाणेकरांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

असे आहे ठाणे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन-

गुरुवारपासून दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, माजिवाडा, मानपाडा, बाळकुंम, कोळशेत, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, वाघबिळ, ब्रह्मांड, विजयनगरी, गांधीनगर, कासारवडवली, ओवळा, सिद्धांचल, सुरकुरपाडा व उन्नती या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर गुरुवारपासून रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत दररोज इटर्निटी, जॉन्सन, समतानगर, सिद्धेश्वर, दोस्ती, आकृती, कळवा, मुंब्रा, जेल, साकेत, ऋतुपार्क व रुस्तमजी या भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 

या झोनिंगमुळे बिघाड दुरुस्त होईपर्यंत ठाणेकरांना निम्मा का होईना पाणी देता शक्य होणार आहे. महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत सर्वत्र कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

टॅग्स :WaterपाणीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका