ठाणे - ठाणेकरांसाठी सुखकर प्रवासी हमी न देता जुन्याच योजनांचा मुलामा देत ठाणे परिवहन सेवेने यंदा ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढ लादण्याचे निश्चित केले आहे. गुरुवारी ठाणे परिवहन सेवेने समितीसमोर २०१९-२० चा ४७६. १२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. डिझेलचे वांरवार वाढत जाणारे दर, सीएनजीचे वाढते दर, परिवहन सेवेच्या संचलनात असलेल्या जुन्या बसेस, जीएसटीमुळे वाहनांच्या किमंतीत झालेली वाढ आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मेट्रोच्या सुरु असलेल्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असल्याने सध्याच्या प्रवासी भाड्यात २० टक्के भाडेवाढ प्रस्तावित करण्यात येत असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानुसार पहिल्या टप्यासाठी २ रुपये आणि शेवटच्या टप्यासाठी ५ रुपये दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी परिवहन समिती याबाबत काय निर्णय घेणार याकडे समस्त ठाणेकरांच्या नजरा लागल्या आहेत. ठाणे परिवहन सेवेमार्फत गुरुवारी परिवहन समितीसमोर २०१८-१९ चे २५१.०३ कोटी आणि सन २०१९-२० चे ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर सहाव्यांदा तिकीट दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० बसेस असल्या तरी देखील रस्त्यावर ८० च्या आसपास बसेस धावत आहेत. तर जीसीसीच्या माध्यमातून १९० आणि एसी २५ बसेस अशा एकूण २९५ च्या आसपास बसेस धावत आहेत. परिवहनमधून अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असून परिवहनचे उत्पन्न हे ३० लाखांच्या घरात आहे. ठाणेकरांना आजही सुखकर प्रवासी हमी परिवहन प्रशासनाने दिलेली नाही. असे असतांना सहाव्यांदा परिवहनने ही २० टक्के तिकीट दरवाढ सुचविली आहे.चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजी दरात झालेली लक्षणीय वाढ, परिवहन सेवेच्या संचलनात असलेल्या जुन्या बसेस यामुळे डिझेलचा होणारा जास्त वापर तसेच शासनाने कार्यान्वित केलेल्या जीएसटीमुळे वाहनांच्या सुटेभाग खरेदी किमंतीत झालेली दरवाढ यासह धक्कादायक म्हणजे सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे कारणही परिवहन प्रशासनाने भाडेवाढीमध्ये पुढे केले आहे. या सर्व बाबींमुळे परिवहन सेवेची दैनंदिन महसुली तुटीमध्ये वाढ होत आहे. ही तुट भरुन काढण्यासाठी इतर उत्पन्नाच्या स्त्रोतांबरोबर भाडेवाढ ही प्रस्तावित करण्यात येत असल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. या आर्थिक वर्षात जुलै २०१९ नंतर ही परिवहनच्या तिकीट दरात २० टक्के भाडेवाढ या प्रमाणे दैनंदिन ३.४० लाख नुसार संभाव्या भाडेवाढ अपेक्षित रक्कम ९ कोटी ३५ लाख अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यानुसार प्रवासी उत्पन्नापोटी १६३.७४ कोटींची जमा अपेक्षित धरण्यात आली आहे.
सहाव्यांदा होणार भाडेवाढयापूर्वी १ जानेवारी २००३, ११ आॅगस्ट २००७, १६ जून २०११ आणि मार्च २०१३ मध्ये भाडेवाढ झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पाचव्यांदा भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता २०१९ मध्ये सहाव्यांदा भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
२ ते ५ रुपये अशी असेल भाडेवाढसाधी बस सध्याचे दर प्रस्तावित दर एसी बस सध्याचे दर प्रस्तावित दरपहिला टप्पा ७ रुपये ९ रुपये २० रुपये २५ रुपये११ वा टप्पा २५ रुपये २९ रुपये ७५ रुपये ८० रुपये२३ वा टप्पा ५१ रुपये ५६ रुपये १३५ रुपये १४० रुपये