जनता मूर्ख आहे, असे या राजकीय मंडळींनी गृहीत धरले आहे. कोरोनाची भीती घातली जात असून सण-उत्सवांवर बंदी लादली जात आहे. मात्र, यांची आंदोलने, रॅली चालतात. लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका आल्या की भांडायचे आणि नंतरची साडेचार वर्षे मिळून खायचे असा यांचा हा धंदा झाला आहे. (मिलिंद गायकवाड - सर्वसामान्य ठाणेकर)
........
करदात्याच्या पैशांची इथे उधळपट्टी केली जात आहे. परंतु, केवळ निवडणुका आल्या की या मंडळींना समस्या दिसतात. इतर दिवस ही मंडळी झोपलेली असते का? ठाणेकरांच्या समस्या त्यांना दिसत नाहीत का? महागाई , रस्त्यांचे झालेले वाटोळे दिसत नाही का? की आम्ही ठाणेकरांनी यांचे अन्याय सहन करायचे, ठाणेकरांना किमान मूलभूत सोयीसुविधा तरी मिळणार आहेत का नाही, याची उत्तरे आधी या बेलगाम झालेल्या राजकारण्यांनी द्यावीत.
(युगंधर जेमसे - सर्वसामान्य ठाणेकर)
इथे करदात्या ठाणेकरांची पाणी, वीज, इतर सोयीसुविधा अनधिकृत बांधकामांना दिले जात आहे. मागील काही वर्षांत शहरात अव्वाच्या सव्वा अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. त्यांना पाठीशी घालणारी हीच राजकीय मंडळी आहे, एखाद्याने तक्रार केली तर थातूरमातूर कारवाई होते. मात्र यामुळेच ठाणेकरांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली असून शहराचे वाटोळे याचमुळे झाले आहे.
(सतीश चाफेकर - सर्वसामान्य ठाणेकर)