शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:17 AM

पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे.

मुंबई : पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. परिणामी, ठाणेकरांचे पाणी महागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईला ठाण्यातील धरणांमधूनच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ठाण्याच्या भरवशावरच तहान भागवायची आणि ठाणेकरांवरच दरवाढ लादायची, असा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे.मुंबई महापालिकेने घेतलेल्या या दरवाढीच्या निर्णयामुळे वर्षागणिक १४.५८ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे. तब्बल १५ वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणी लागते. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. यामधील १५० दशलक्ष लीटर पाणी हे ठाणे आणि भिवंडीला दिले जाते.पालिका हद्दीत लागू असलेले दर, नगरबाह्य विभागास लागू असलेले दर आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाद्वारे महापालिकेला लागू असलेल्या दरांनुसार ही दरवाढीची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार, पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. ठाणे पालिका क्षेत्रास आवश्यक ७०० दशलक्ष लीटर पाणी एमआयडीसी पुरवते. मुंबई महापालिकेकडून दररोज १५० दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. दरम्यान, पाण्याची दरवाढ महानगरपालिकेच्या मंजुरीच्या दिनांकापासून ३० दिवसांनी आणि ९० दिवसांपूर्वी अंमलबजावणी होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका