ठाणे : क्षुल्लक कारणांवरून घरातून पळ काढून रेल्वे आणि एसटीस्थानकांचा आश्रय घेणारी १३ मुले ठाणेनगर पोलिसांच्या सर्तकतेने स्वगृही परतली आहेत. यामध्ये नाशिकच्या एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. स्वगृही परतलेल्या मुलांमध्ये तब्बल सात मुलींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक शासकीय कार्यालयांसह ठाणे रेल्वेस्थानक आणि एसटीस्थानक, मुख्य बाजारपेठ असा परिसर येतो. त्यातच, पालकांनी काही गोष्टींवरून आवाज चढवल्यास त्याच गोष्टीचा राग मनात धरून मुले घर सोडतात. या वेळी ती शक्यतो रेल्वे किंवा एसटीस्थानकात येऊन भटकतात. अशा प्रकारे ठाणे स्थानकात दक्ष नागरिकांमुळे आणि पोलिसांच्या सतर्क तेने १२ घटनांमधील १३ मुले गेल्या काही महिन्यांत परतली आहेत. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या १२ घटनांमध्ये पाच ते सहा दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, उर्वरित गुन्हे दाखल होण्यापूर्वीच त्यामधील मुलांना पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.>मैत्रिणीला शोधण्यासाठी विकला मोबाइलठाण्यातील एक मुलगी अचानक घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. दरम्यान, तिच्या आईने तिच्या मैत्रिणीला तुझ्यामुळे माझी मुलगी गेली, असा आरोप करून पोलिसात जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेली ती मुलगी मित्रासोबत मैत्रिणीचा शोध घेण्यास निघाली. दरम्यान, त्यांच्याकडील पैैसे संपल्यावर त्यांनी मोबाइलही विकले. दरम्यान, त्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन सहकार्य करण्याची मागणी केली. त्या वेळी घरातून गेलेली ती मैैत्रीण आजीकडे गेल्याचे समोर आले.>आईने दाखवलासावत्र आईचा धाकनाशिकमधील एक अल्पवयीन मुलगी ठाण्यात मिळून आली होती. याप्रकरणी तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. परंतुु, ती ठाण्यात मिळून आल्यानंतर धक्क ादायक बाब पुढे आली. त्या वेळी आजीआईसोबत राहणारी मुलगी अभ्यास करत नसल्याने तिच्या आईने तिला मुंबईतील सावत्र आईकडे पाठवून देईल, असा धाक दाखवल्याचे समोर आले आहे.>खेळताखेळता झोपी गेलाठाण्यातील एक पाचवर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत लपंडाव खेळत होता. त्या वेळी लपताना तो झाकून ठेवलेल्या दुचाकीजवळ लपला. तेथे त्याचा डोळा लागल्याने तो झोपी गेला होता. याचदरम्यान, शोधाशोध सुरू झाल्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो मिळून आला.
ठाणेनगर पोलिसांच्या सतर्कतेने १२ घटनांतील १३ मुले परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:22 AM