शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

ठाण्यातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगणार, २० दिवसात केले जाणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:05 PM

ठाणे महापालिकेने शहरातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील २० दिवसात ही शौचालये रंगविली जाणार असून त्यावर ब्रॅन्ड ठाण्याचा लोगो देखील प्रकाशित केला जाणार आहे.

ठळक मुद्देगुगलवरही दिसणार शहरातील शौचालये ४० अभियंत्यांची फौज करणार काम

ठाणे - स्वस्छ भारत अभियनाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार शहरातील शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम देखील पालिकेने हाती घेतली आहे. परंतु या शौचालयांना एक वेगळी ओखळ निर्माण व्हावी या उद्देशाने, ठाणे महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. शहरातील तब्बल १२०० युनिटला आता ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगसंगीतमध्ये रंगविले जाणार आहे. तसेच ब्रॅन्ड ठाण्याचा लोगो देखील प्रत्येक शौचालयावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील २० दिवसात ही मोहीम पालिकेने फत्ते करण्याचा निर्णय घेतला आहे.ठाणे महापालिकेच्या वतीने स्वच्छेतेच्या बाबतीत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये १०० किलो कचºयाचे वर्गीकरण यापुढे त्याच सोसायटींना लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जे नगरसेवक आपल्या प्रभागात स्वच्छेतेची कामे करतील त्या टॉप १० नगरसेवकांना २५ लाखांचा अतिरिक्त निधी देण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.

  • ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगसंगतीमध्ये हे शौचालये रंगविले जात असतांनाच ही शौचालये आता तुम्ही गुगलद्वारे देखील सर्च करु शकणार आहात. एका क्लिकमध्ये कोणत्या भागात कोणते शौचलय आहे, हे पाहण्याची संधी मिळणार आहे. ही शौचालये आता जीओटॅगींगद्वारे पाहण्याची संधी मिळणार असून त्याचे कामही आता सुरु झाले आहे.

दरम्यान आता शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम देखील पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार या शौचालयांचा सर्व्हे देखील सुरु झाला आहे. मोठ्या स्वरुपाची कामे पुढील टप्यात करण्यात येणार आहेत. परंतु पहिल्या टप्यात आता याठिकाणी जाण्यासाठी पायवाट सुस्थितीत केली जाणार आहे. तसेच त्याठिकाणी वीज आणि पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय या सुविधा देत असतांनाच या शौचालयांना एका रंग संगतीत जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार यासाठी तब्बल ४० अभियंत्याची फौज तयार करण्यात आली आहे. प्रत्येक अभियंता आता शहरातील शौचालयांची पाहणी करणार आहेत. त्यानुसार पुढील २० दिवसात शहरातील १२०० युनिट शौचालये ठाण्याच्या ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगसंगतीत रंगविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याशिवाय महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे शौचालय असा उल्लेख देखील मोठ्या आणि ठळक स्वरुपात केला जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त