शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

ठाण्यात ८१ हजार मतदारांची ‘नोटा’ ला पसंती

By admin | Published: February 27, 2017 3:32 AM

ठाणे महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्याप्रमाणात ‘नोटा’ पर्यायाचा वापर हे यंदाच्या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरले आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी २२७ प्रभागांमध्ये जवळपास ७२ हजार मुंबईकरांनी उमेदवारांना मतदान करण्याऐवजी ‘नोटा’ला अधिक पसंती दिली आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात ३३ प्रभागातील १३१ जागांसाठी तब्बल ८१ हजार ८८८ ठाणेकरांनी उमेदवाराऐवजी ‘नोटा’वर आपली मोहर उमटवली आहे. अनेक प्रभागांमध्ये उमेदवार निवडण्याऐवजी मतदारराजाने ‘नोटा’चा पर्याय स्वीकारल्याचे दिसत आहे. ‘नोटा’च्या वाढत्या वापराला लोकशाहीतील एक नवी सुरुवात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यातही मतदार जेव्हा उमेदवारांचे कार्य आणि त्यांच्या प्रतिमेपासून समाधानी नसतात, तेव्हा ते ‘नोटा’चा वापर करतात. राजकीय पक्षांसाठी हा एक इशारा आहे. सर्व पक्षांना मतदारांचा रोष समजून घेण्याची गरज आहे. वेळेत याकडे लक्ष दिले गेले नाही तर याचा वाईट परिणाम होईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. ठाण्यात चार प्रभागांचा मिळून एक वॉर्ड झाला असल्याने त्यातील एक ते दोन उमेदवार हे मतदाराचे परिचायचे दिसले असून उर्वरित परिचय नसलेल्या उमेदवारांना नापंसतीच दिल्याचे या निकालावरुन दिसत आहे. ईव्हीएम मशिनमध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध झाल्याने अधिक प्रमाणात नागरिकांकडून नोटाचा वापर केला आहे. ज्या प्रभागांकडे ‘नोटा’चा वापर केला आहे, तेथे निश्चित स्वरु पात उमेदवारांविरोधात मतदारांनी असंतोष व्यक्त केल्याचे दिसत आहेदरम्यान ठाण्यातील ३३ प्रभागामधील प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये, तब्बल १८४७ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. तर प्रभाग क्रमांक २२ अ,ब,क आणि ड मिळून तब्बल ४१२५ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. यामध्ये २२ अ मध्ये १३७१, ब मध्ये १०४४, क मध्ये १०७६ आणि ड मध्ये ६३४ असे प्रमाण आहे. तर ९ अ मध्येदेखील १३६८, ११ अ मध्ये १००४, १ अ मध्ये १२२२, ५ ब मध्ये १०४८, १६ ब मध्ये १०७०, १९ अ मध्ये १३२५, २० ब मध्ये १०३५,क मध्ये १०७८, अशा प्रकारे एकूण ८१ हजार ८८८ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण असेच राहिले तर उमेदवाराला धोकाही संभावण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)