ठाणे : ४०० व्या कट्ट्याकडे वाटचाल करणाऱ्या अभिनय कट्टयावर सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत.त्यातच भर पडली आहे हिंदी एकांकिकांची. कट्टयावर आओगे जब तुम हि हिंदी एकांकिका सादर करत त्यातील कालाकारांनी मध्यप्रदेश राज्यातील "गावकॊर"प्रथेवर भाष्य केले.
विवाहित महिलांना मासिक पाळीच्या दिवसात गावाबाहेरील एका जागेत ०४ दिवस ठेवले जाते. या जागेस गावकोर असे म्हंटले जाते.मध्यप्रदेश राज्यात फार पूर्वीपासून हि प्रथा चालत आली असून याचा महिलांना मानसिक त्रास होतो असे एकांकिकेत दाखवण्यात आले आहे. या गावकोर च्या ठिकाणी गेलेल्या एका महिलेची जय नावाच्या तरुणाशी ओळख होते.जय ला कविता करण्याचा छंद असतो,पुढे दोघांची ओळख होते आणि मैत्री वाढत जाते. पण पुढे तिला दिवस जातात आणि मासिक पाळी येणे बंद झाल्याने ती गावोकर ला जाऊ शकत नाही. जय ला आपण भेटू शकत नाही याची तिला खंत वाटते मात्र कवितेच्या माध्यमातून ती जय सोबत संवाद सादते. तिचा नवरा स्त्री ही केवळ उपभोग वस्तू आहे या वृत्तीचा असल्याने ती मानसिक ढासळते. गावकोर प्रथा कायमची बंद करून स्त्रीला माणुसकीची वागणूक द्यावी अशी या एकांकिकेतून मागणी करण्यात आली. यावेळी कट्ट्याचा कलाकार कुणाल पगारे याने प्यार का पंचनामा हि एकपात्री सादर केली.प्रथमेश मंडलिक याने इंसानियात हि एकपात्री सादर केली.कट्ट्याचे निवेदन सहदेव कोळंबकर याने केले. दीपप्रज्वलन आशा राजदेरकर यांनी केले. अश्या पद्धतीच्या एकांकिका आम्हाला कट्टयावर पाहायला मिळतात म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.अशे वेगवेगळे विषय बघायला आम्हला आवडतात, अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी ही नाट्य चळवळ अशीच चालू ठेवावी असे एका महिला प्रेक्षकाने सांगितले.