शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सुज्ञ..." 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
4
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
5
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
6
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
7
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
8
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
9
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
10
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
11
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
12
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
13
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
14
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
15
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
17
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
18
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
19
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
20
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

दोन तासांत १०० मिमी पावसाने ठाण्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:17 AM

२०० घरांत पाणी, ७० जणांची केली सुटका

ठाणे : शुक्रवारी सुरू झालेल्या पावसाने शनिवारी सकाळी अवघ्या दोन तासांत संपूर्ण ठाणे जलमय करून टाकले होते. या दोन तासांत तब्बल १०० मिमी पेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. तर, शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले. शनिवारी सकाळीच जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. तसेच सुमारे २०० रहिवाशांच्या घरात गुडघाभर पाणी साचल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.शनिवारी पहाटेपासून दिवसभरात २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून या वर्षातील काही तासांमध्ये पडलेल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील तब्बल ३९ हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. शहरातील सर्व शाळांना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुटी जाहीर केली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते व रेल्वेसेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला. त्यामुळे नागरिकांना वाहतूक पोलिसांनी पुन्हा परत घरी जाण्याच्या सूचना केल्या. अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. शहरातील काही भागांत संरक्षक भिंती पडल्याच्या घटना घडल्या. दिव्यात नाल्याची भिंत पडून तीसवर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर, घोडबंदर भागात अपघातात एकाचा आणि मनोरुग्णालय परिसरात शॉक लागून एकाचा मृत्यू झाला.रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र दिसत होते. सकाळी त्यात आणखी भर पडली. लख्ख अंधार आणि पाऊस यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. शहरातील वृंदावन सोसायटी परिसर जलमय झाला होता. तसेच संभाजीनगर, चिरागनगर आदी भागांतील रहिवाशांच्या घरांत गुडघाभर पाणी शिरले होते. कोरम मॉल, शनी मंदिर साईनाथनगर, पारसिकनगर, पातलीपाडा ते हिरानंदानी या भागांतही पाणीचपाणी अशी परिस्थिती होती. त्यामुळे या भागातून येणाºया वाहनचालकांना सतर्कतेच्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलिसांनी परत पाठवले. याशिवाय आलिशान थिएटर मुंब्रा, वंदना सोसायटी नौपाडा, क्रिटीकेअर हॉस्पिटल, खारटन रोड, चिरागनगर, आनंदनगर कोपरी, बाराबंगला, श्रीरंग सोसायटी, तारा निवास पाचपाखाडी, ब्राह्मण सोसायटी नौपाडा, गावदेवी मंदिर, इंदिरानगर, लोकमान्य टीएमटी बसडेपो, प्रभात सिनेमा, वंदना सिनेमा, राममारुती रोज, उदयनगर नौपाडा, यशोधननगर, वर्तकनगर पोलीस स्टेशन, सावरकरनगर, अ‍ॅग्रीकल्चरल आॅफिस, डी मार्ट पातलीपाडा, मनीषा सोसायटी साकेत रोड, गणेश कृपा बिल्डिंग, माजिवडा, वागळे इस्टेट, गडकरी रंगायतन, अमन पार्क मनोरमानगर, सिद्धेश्वर टॉवर खोपट, मफतलाल कॉलनी कळवा, सेंट्रल जेल परिसर, किशोरेनगर कोपरी पूर्व आदींसह शहरातील इतर भागांतही गुडघाभर पाणी साचले होते. मानपाडा येथील दोस्ती गृहसंकुलासमोरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. तर, दुसरीकडे दिव्यातही पाऊस आणि त्यात भरतीचे पाणी यामुळे दिवा साबेगाव आणि आजूबाजूच्या गावांत पाणी शिरले होते. त्यामुळे येथील रहिवाशांचे चांगलेच हाल झाले. शहरातील खोपट, सागर निवास, श्रीरंग, देवयानी सोसायटी, वागळे बसडेपो, विजय पार्क, रघुनाथनगर, आदींसह १४ ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या आहेत. चार ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत आले होते.दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी समुद्रास मोठी भरती असल्याने सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे दुपारी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पाणी साचले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी ६ च्या सुमारास सोसाट्याचा वाराही सुटल्याने वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले. ठाण्यात प्रथमच सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे या कालावधीत एखादी दुर्घटना घडली असती, तर त्याचे परिणामही तितकेच वाईट झाले असते. सुदैवाने अशी कोणतीही घटना घडली नाही.दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. दरम्यान, संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीमधील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी ४.५८ मीटरची भरती असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट राहून नगरसेवकांच्या समन्वयाने नागरिकांच्या तक्र ारी दूर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पाणी साचले आहे, तेथे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.राम गणेश गडकरी रंगायतनसमोर एका विकासकाची साइट सुरू असून या साइटवरील पाणी थेट पम्पिंग स्टेशनच्या जनरेटरपर्यंत घुसू लागले होते. गडकरी रंगायतनशेजारी असणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कम्पाउंडमधे ठाणे महापालिकेचे पम्पिंग स्टेशन आहे. शहरातील पाणी त्याद्वारे थेट खाडीत सोडले जाते. याच भागात विकासकाकडून बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्यामध्ये साचणाºया पाण्याचा निचरा करण्याचे कोणतेही नियोजन बिल्डरकडून करण्यात आलेले नाही. उलट, हे पाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे गडकरी आणि आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते.ठाणे जिल्ह्यात १४० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. पाणी साचले आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधून सर्वांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. रेस्क्यू टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शाळांनाही सुट्या देण्यात आल्या आहेत. ज्या काही उपाययोजना करायच्या असतील, त्या करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हाभरपावसातही नागरिकांना सुरक्षितस्थळी सोडण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी विशेष नियोजन केल्याचे दिसून आले. गुडघाभर पाणी असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस सेवेत तत्पर असल्याचे दिसून आले.पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेकरांनीही गरज नसेल, तर बाहेर पडू नये. विजेच्या उघड्या वायरींना हात लावू नका, तसेच इतर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणेटीएमटीच्या ५५ बस केल्या रद्द तर व्होल्वो बसची सेवा बंदचटीएमटीच्या दररोज निघणाºया बसगाड्यांपैकी शनिवारी सकाळी ५५ बसगाड्या कमी निघाल्या. १०.३० नंतर काही वेळ टीएमटीची बससेवा बंद करण्यात आली होती. ठाणे परिवहनच्या वागळे आगारामधून ८० बसऐवजी ४९ बाहेर पडल्या तर आनंदनगरमधून १८० च्या ऐवजी १६० बसगाड्या, कळवा आगारामधून २५ पैकी ५ बस रद्द करून २० बस सोडण्यात आल्या होत्या.विशेष म्हणजे या काळात ठाणे परिवहनची व्होल्वो बस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा आणि इतर खाजगी वाहतुकीशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे नालासोपाºयाला जाणारी रूट नं ६९ ही टीएमटीची बस घोडबंदर येथील डी मार्टच्या इथे आल्यानंतर बसमध्ये अक्षरश: पाणी शिरले.बसमध्ये प्रवासी असल्याने प्रवाशांनी बसमध्ये पाणी घुसल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. लो फ्लोअरच्या बस असल्याने या बसमध्ये पाणी घुसत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ही बस नालासोपारापर्यंत नेण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.श्रीरंगसह वृंदावनमधील ७० नागरिकांना काढले बाहेरसकाळी सव्वासातच्या सुमारास या परिसरातील असलेला नाला अर्ध्या तासांत तुडुंब भरून वाहू लागल्याने तसेच सखल भाग असल्याने गुडघ्यावर पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले. शहरातील सखल भागाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीने पुढे काय केले, याची काही माहिती मिळू शकलेली नसून अशा प्रकारे पाणी साचण्याची ही या पावसाळ्यातील चौथी घटना असल्याचे दक्ष नागरिक चंद्रकांत तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस