ठाणे: पाच लाखांच्या हुंडयासाठी पत्नीचा छळ करुन तिच्या तक्रारीनंतर घटस्फोटाचा दावा दाखल करणा-या गंगेश यादव (३५, रा. जौनपूर, उतरप्रदेश) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.इंदू (३०, रा. वसंतविहार, ठाणे) आणि गंगेश (इंजिनिअर) यांचा विवाह १ जून २०१२ रोजी उत्तरप्रदेशातील जौनपूर येथे झाला होता. सुरुवातीला जौनपूर येथे राहिल्यानंतर हे नवदाम्पत्य ठाण्याला पोखरण रोड क्रमांक दोन येथील जवाहरनगर हिरालाल शेठची चाळीत वास्तव्याला आले. सुरुवातीचे काही दिवस बरे गेल्यानंतर यादव कुटूंबियांनी तिचा क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन छळ सुरु केला. लग्नात कोणतीही चांगली वस्तू आणली नाही म्हणून स्कॉर्पिओ गाडी आणि नविन व्यवसायासाठी पाच लाख रुपये माहेरुन आणण्यासाठी तिचा मानसिक शारिरिक छळ करुन घर सोडून जाण्यासाठीही सासरच्या मंडळींनी वारंवार तिच्याकडे तगादा लावला. पाच लाखांची मागणी पूर्ण न केल्याने तिला मारहाण करुन शिवीगाळी आणि दमदाटीही देण्यात आली. त्याच काळात गंगेश हा तिला काहीही माहिती न देता तिला सोडून निघून गेला. दरम्यान, सासरच्यांनी पुन्हा हुंडयाची मागणी करीत तिला मारहाण करुन माहेरी जाण्यास भाग पाडले. तिने काही दिवसांनी सासरे लोलारकनाथ यांच्याकडे पतीविषयी विचारणा केली, तेंव्हा त्यांनी तिला वरवंटा डोक्यात मारुन जखमी केले. शिवाय हातानेही मारहाण केली. मे २०१३ ते १ सप्टेंबर २०१४ या काळात हा प्रकार सुरु होता. तिने या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर याप्रकरणी २ सप्टेंबर २०१४ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली. तो दिल्लीतील नोएडा भागात पसार झाला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर लोलारकनाथ यादव (५७) यांना आधी २ सप्टेंबर २०१४ रोजी त्यानंतर तिची नणंद सरीता (३६) हिला १८ आॅगस्ट २०१५ रोजी पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, पत्नीने कौटंूबिक हिंसाचार तसेच हुंडयासाठी छळाची तक्रार दाखल केल्यानंतर तिकडे गंगेश यादवने जौनपूर न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज २०१५ मध्ये दाखल केला. याच अर्जाच्या सुनावणीसाठी तो जौनपूर न्यायालयात २३ फेब्रुवारी २०१८ रोजी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, रविदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास हटेकर, हवालदार पी.एच. शिंदे, कॉन्स्टेबल सागर पाटील आणि एस. पी. निकम आदींच्या पथकाने त्याला जौनपूर येथून ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेली साडे तीन वर्ष पोलिसांना हुलकावणी देत होता. घटस्फोटाचा अर्ज करुन तो यातून कायदेशीररित्या निसटण्याच्या प्रयत्नात असतांनाच जौनपूर न्यायालयातून त्याची २५ फेब्रुवारी पर्यंत ट्रान्झिस्ट कस्टडी घेऊन रविवारी वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ठाण्यात पाच लाखांसाठी पत्नीचा छळ: पतीला तीन वर्षांनी उत्तरप्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:01 IST
लग्नात चांगली वस्तू आणली नाही म्हणून स्कॉर्पिओ गाडी आणि नविन व्यवसायासाठी पाच लाख रुपये माहेरुन आणण्यासाठी पत्नीचा छळ करणाºया पतीला साडे तीन वर्षांनी वर्तकनगर पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली.
ठाण्यात पाच लाखांसाठी पत्नीचा छळ: पतीला तीन वर्षांनी उत्तरप्रदेशातून अटक
ठळक मुद्देगाडी आणि नविन व्यवसायासाठी पैशांचा तगादातीन वर्षांपासून पोलिसांना गुंगाराजौनपूर मध्ये दिला घटस्फोटासाठी अर्ज