ठाणे : ४०० व्या अभिनय कट्ट्यावर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि नवोदीत कवी संकेत म्हात्रे या पितापुत्रांचा काव्यसंवाद रंगला होता. यावेळी ज्येष्ठ आणि नवोदीत कवींची जुगलबंदी रंगली होती. रसिकांनी प्रत्येक कविताला टाळ््यांची उत्स्फुर्त दाद दिली.अरुण म्हात्रे आणि संकेत यांचा अब्द शब्द हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. कविता ही सगळ््या गोष्टींमधले मुळ असते. नाटकातील कविता, चित्रातील कविता. संगीतातील कविता, आयुष्यातील कविता कळली पाहिजे. अनेक कलाकारांना कवितेचा अभ्यास असल्यामुळे ते चांगले सादरीकरण करु शकतात. उदाहरणार्थ कुसुमाग्रज हे कवी असल्यामुळे त्यांनी उत्कृष्ट नाटक लिहीले तर हृदयनाथ मंगेशकरांचा कवितेचा उत्कृष्ट अभ्यास असल्यामुळे ते चांगले संगीतकार आहेत. आजवर अनेक दिग्ग्ज कवींना पाहीले आहे, ऐकले असल्यामुळे ही काव्याची परंपरा आली असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. अभिनय कट्ट्यावरील गर्दी पाहता जणू आजच दिवाळी असल्याचे उद्गार त्यांनी काढले. यावेळी अरुण म्हात्रे यांनी ‘ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे’, ‘कॉलेजच्या आठवणी’, ‘चिमण्या मला उठवतात’, ‘जसे स्वप्न कळते तसा चालतो मी’, या कविता तर संकेतने आपल्या वडिलांना हम भी किसीसे कम नाही असे म्हणत ‘कधी वाटे आई काँग्रेस आणि बाबा बीजेपी’, ‘आजीच्या सुरकुत्या’, ‘तिथे भेटुया मित्रा’ या स्वरचित कविता सादर केल्या. शेवटी अरुण म्हात्रे यांनी ‘ते दिवस आता कुठे फुले बोलायची’ या कवितेने कार्यक्रमाचा शेवट केला. या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा दिग्वीजय चव्हाण यांनी सांभाळली. अभिनय कट्टा ही सांस्कृतिक चळवळ असून ही चळवळ ठाण्याची सांस्कृतिक ओळख आहे. पावसासारखी आपत्ती आली तरी हा कट्टा सांस्कृतिक चळवळ जगवत आहे असे सांगत आता ४००० व्या कट्ट्यावर भेटू या शब्दांत अभिनय कट्ट्याचे कौतुक करीत दिग्दर्शख विजू माने यांनी पुढील वाटचालीसाठी किरण नाकती यांस सदिच्छा दिल्या.
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगला पिता-पुत्रांचा काव्यसंवाद, स्वरचित कवितांची रंगली जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 3:57 PM
अभिनय कट्ट्याचा ४०० वा विक्रमी कट्टा मोठ्या थाटामाटात पार पडला.
ठळक मुद्देअभिनय कट्ट्याचा ४०० वा विक्रमी कट्टा मोठ्या थाटामाटात पार पिता-पुत्रांचा काव्यसंवादस्वरचित कवितांची रंगली जुगलबंदी