ठाणे : अभिनय कट्टा क्रमांक ४३५ वर फिमी चक्करमध्ये अवतरले हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या चित्रपटातील विनोदी क्षण,दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींनी गाजवलेल्या भूमिका. मराठी कलाकाराला हिंदी चित्रपटसृष्टीतही तितक्याच सहजतेने स्वतःची कला सादर करता यावी ह्यासाठी अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून हिंदी चित्रपटसृष्टीतील काही धम्माल प्रसंग नाट्यरूपांतरण करून सादर करण्याची जुगलबंदी म्हणजे फिल्मी चक्कर.
फिल्मी चक्कर मध्ये अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी विविध विनोदी चित्रपटातील विनोदी प्रसंग तितक्याच ताकदीने नाट्यरूपांतरणातून सादर केले. सहदेव कोळंबकर,महेश झिरपे,रुक्मिणी कदम ह्यांनी 'पार्टनर'; शुभांगी भालेकर,उत्तम ठाकूर ह्यांनी आमदनी अठणी खर्चा रुपय्या;कदिर शेख,आतिष जगताप,विद्या पवार ह्यांनी 'जिस देश मै गंगा रेहता हैं'; राजन मयेकर,न्युतन लंके,मौसमी घाणेकर ह्यांनी 'शोले' चित्रपटातील विनोदी प्रसंगाचे सादरीकरण केले.तसेच माधुरी कोळी,सहदेव साळकर, अभय पवार ह्यांनी 'जुदाई'; परेश दळवी, ओंकार मराठे, रोहिणी राठोड ह्यांनी १९६६ मधील 'प्यार किये जा'; रोहिणी थोरात, प्रतिभा घाडगे, दत्तराज सकपाळ ह्यांनी 'रूप की राणी चोरोका राजा' आणि साक्षी महाडिक,सई कदम, शनी जाधव ह्यांनी 'चुपके चुपके' चित्रपटातील प्रसंग धम्माल रित्या सादर करणे. अभिषेक जाधव ह्यांनी हैदर चित्रपटातील प्रसंग सदर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. सदर कार्यक्रमाचे संगीत आदित्य नाकती आणि प्रकाश योजना परेश दळवी आणि ओमकार मराठे ह्यांनी सांभाळली. सादर फिल्मी चक्कारचे फिल्मी स्टाईल मध्ये निवेदन अभिनय कट्ट्याचा कलाकार कल्पेश डुकरे ह्याने केले. कट्टा क्रमांक ४३५ वर गेल्या रविवारी झालेल्या नृत्यभिनय स्पर्धेचा आणि टी.आर.पी.नंबर 1 चा निकाल जाहीर करण्यात आला. नृत्यभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक पुलवामा हल्ला (शनी जाधव, विद्या पवार, आदित्य नाकती);द्वितीय क्रमांक भोंदू बाबांचं साम्राज्य (शिल्पा लाडवांते, अजित भोसले, राजन मयेकर) आणि उत्तेजनार्थ परितोअहिक दुष्काळ (रोहिणी थोरात,शु भांगी भालेकर, अतिष जगताप) ह्या नृत्यभिनय सादरीकरनाना मिळाले.टी.आर.पी.नंबर 1 मध्ये प्रथम क्रमांक उत्तम ठाकूर, शुभांगी भालेकर; द्वितीय क्रमांक प्रतिभा घाडगे, रोहिणी थोरात, दत्तराज सपकाळ; तृतीय क्रमांक कादिर शेख, विद्या पवार, अतिष जगताप ह्यांना मिळाला.
कलाकाराचा सर्वांगीण विकास हेच अभिनय कट्ट्याचे आजवरचे ध्येय आहे.हिंदी चित्रपटसृष्टी तितक्याच ताकदीने मराठी कलाकार उभा राहावा त्याचा हिंदी भाषे संबंधाचा न्यूनगंड दूर व्हावा ह्याचाच फिल्मी चक्कर सुरू करण्यात आले.अभिनय कट्ट्याच्या कलाकाराणी तितक्याच ताकदीने सर्व प्रसंग सादर करून ह्या उपक्रमाला न्याय दिला असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.