ठाणे : संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत चोखामेळा, प्रभू श्री राम,शबरी आणि आई या विषयांवर आधारित भक्तिगीते सादर करण्यात आली.आपल्या दैनंदिन जगण्यात देखील विठ्ठल आहे.आपण देवाला भेटायला जातो तसे देव ही आपल्या भेटीला येत असतो हे कथेच्या मार्फत दृष्टांत सांगत ह.भ.प विक्रांत महाराज शिंदे यांनी सांगितले.
सर्वच वारकऱ्यांना वारीचे वेध लागले आहे. आषाढि वारीचे औचित्य साधत ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर संगीत कट्ट्याचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात ह.भ.प विक्रांत महाराज शिंदे यांनी सुमधूर भक्ती गीते सादर करत रसिकांना मंत्र मुग्ध केले.यंदाचा हा १५ क्रमांक चा कट्टा होता. जीवन जगत असताना आईची थाप पाठीवर असणे खूप महत्वाचे,आई मुळेच जगण्याला अर्थ आहे.आज समाजात आई फक्त शिवी पुरतीच मर्यादित राहिली असून हे दृश्य आपण बदलले पाहिजे.आई प्रत्येकाच्या हृदयात वसली तरच उद्याचा तरुण घडेल असे महाराजांनी या भक्ती कथेत सांगितले.संजय दळवी,संदीप डोंगरे,अजित सावंत,निलेश चव्हाण,मयूर शिंदे,संदेश दळवी यांनी कार्यक्रमात गायनासाठी साथ दिली.प्रणव कोळी,निनाद घाग,सायली अंगणे यांनी "माऊली माऊली" हे गाणे गात प्रेक्षकांची मने जिंकली.कट्ट्याचे निवेदन कुंदन भोसले,सचिन हिनुकले यांनी केले.दीपप्रज्वलन श्री पंडित आजोबा यांनी केले. नुस्ता देवाचा धावा करून देव भेटत नाही.आपल्या आचरणात,दैनंदिन कामात देखील देव शोधता आला पाहिजे.आज समाजात अश्या कार्यक्रमांची गरज आहे.या मधयामातूनच लहान मुलांवर संस्कार होत असतात.आज अश्या पद्धतीची कला लोप पावत चालली असून,कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे.असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले.