शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

सत्तेच्या आमिषाने ठाण्यातील भाजपाचे बंडोबा झाले थंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 2:57 AM

महापालिकेत सत्तेचा वाटा देण्याचे आमिष दाखविल्यानंतर भाजपाचे ठाण्यातील २३ बंडोबा थंड झाले. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाणे महापालिकेतील २३ नगरसेवकांनी तसे पत्र श्रेष्ठींना दिले होते.

ठाणे : महापालिकेत सत्तेचा वाटा देण्याचे आमिष दाखविल्यानंतर भाजपाचे ठाण्यातील २३ बंडोबा थंड झाले. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाणे महापालिकेतील २३ नगरसेवकांनी तसे पत्र श्रेष्ठींना दिले होते. मात्र, सत्तेत वाटा देऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगताच या बंडोबांनी आपल्या तलवारी म्यान करून शिवसेनेचा प्रचार करण्याची ग्वाही दिली. या बदल्यात शिवसेनेनेही मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्तेत वाटा मागितला आहे.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि रायगडचे भाजपाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर विचारे विरुद्ध नारायण पवार गटातील वादावर पडदा पडला. विचारे यांच्या ऐवजी दुसरा कोणताही उमेदवार दिल्यास त्यासाठी काम करण्याची तयारी असल्याची भूमिका या २३ नगरसेवकांनी घेतली होती. यामध्ये भाजपाचे गटनेते नारायण पवार, अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर ही मंडळी आघाडीवर होती. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजपा असा वाद ठाणे लोकसभा मतदारसंघात निर्माण झाला होता. त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी या वादावर पडदा पडला.भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात ही समन्वय बैठक पार पडली. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे, राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे आमदार प्रताप सरनाईक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपाचे गटनेते नारायण पवार, अशोक राऊळ आदींसह इतर पदाधिकारी तेव्हा उपस्थित होते. बैठकीत नाराजांनी ठाणे पालिकेत सत्तेत वाटा मागितला. तो मान्य करीत त्यांची मनधरणी करून एकदिलाने काम करण्याची शपथ देण्यात आली.आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारापर्यंत कसे पोहोचायचे याची रणनिती ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार सुरुवातीला विधानसभानिहाय मोर्चेबांधणी केली जाणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या सभा या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भार्इंदर शहरात घेण्यात येणार असल्याचेही निश्चित करण्यात आले. परंतु त्यांच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रयत्नयेत्या २४ एप्रिलला मुंंबईत युतीच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यामुळे याच दिवशी ठाणे जिल्ह्यात त्यांची सभा घेण्यासाठी जिल्ह्यातील युतीचे पदाधिकारी आग्रही आहेत. त्यानुसार या सभेची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ती कल्याणच्या फडके मैदानात घेण्याची चाचपणीही सुरूआहे.छोट्या-मोठ्या तक्रारी होत्या, त्या दूर करण्यात आल्या आहेत. मागील २५ वर्षे शिवसेना, भाजपाची युती आहे, त्यामुळे समन्वयाने यावर तोडगा काढण्यात आला.- शिवसेना नेते एकनाथ शिंदे,पालकमंत्री, ठाणे जिल्हाभाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा विचारे यांच्यासाठी एकदिलाने काम करणार आहे. काही नाराजी होती, ती दूर करण्याचे आदेश पक्षाने दिले होते. त्यानुसार ती दूर करण्यात आली.- भाजपा नेते रवींद्र चव्हाण,पालकमंत्री, रायगड जिल्हाकाही नाराजी होती, परंतु ती काही टोकाची नव्हती. आम्ही मागील कित्येक वर्षे दोन भावांसारखे एकत्र काम करीत आहोत. त्यामुळे आमच्यात तसे टोकाचे मतभेद नव्हते. जे काही होते, ते दूर झालेले आहेत.- राजन विचारे,शिवसेना उमेदवारदोन भावंडामध्ये भांडणे होतात. परंतु, ती आता मिटलेली आहेत. आमच्यात छोटे मोठे मतभेद होते, परंतु, आता पक्षाने आदेश दिल्याने आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत.- नारायण पवार, ठामपा गटनेते, भाजपामतभेद हे छोटे नव्हते, ते मोठेच होते. परंतु, आता पक्षाने आदेश दिले आहेत, त्यानुसार बैठकीत ज्या काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, त्याची अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे.- अशोक राऊळ,ज्येष्ठ नगरसेवक,भाजपा

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक