ठाणे: ठाण्यातील सिनेगॉग या ज्यूंच्या धार्मिक स्थळाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देणारा ई- मेल हा अमेरिकेशी संबंधित संगणक सर्व्हरमधून आला आहे. मात्र, असे एखादे अॅप्लीकेशन भारतातूनही चालविता येते, त्यामुळे धमकीचा मेल पाठविणारी ती खोडसाळ व्यक्ती भारतीय आहे की परदेशी याची नेमकी खातरजमा झाली नसल्याची माहिती ठाणेपोलिसांनी शनिवारी दिली.
ठाण्यातील सिनेगॉग या धार्मिक स्थळाच्या मेलवर आलेला धमकीचा मजकूर हा अमेरिकेतून आल्याची माहिती समोर आली. परंतू, अशी माहिती कोणी आणि कशी पसरवली याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, धमकी पाठविणारा हा मेल अमेरिकेशी संबंधित सर्व्हरमधून आल्याच्या वृत्ताला परिमंडळ एक ठाणे शहरचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दुजोरा दिला. परंतू, असे एखादे अॅप्लीकेशन हे भारतातूनही हाताळता येते. त्यामुळेच अजूनही नेमक्या निष्कर्षापर्यत तपास आलेला नाही. हा तपास अजूनही स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि सायबर विभागाकडूनही सुरु असून अजूही यामध्ये कोणाचेही नाव समोर आले नाही. त्यामुळेच कोणालाही ताब्यात किंवा अटकही झालेली नसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. काय घडते होते....सुमारे दीडशे वर्ष जुन्या असलेल्या पोतुर्गीज कालीन सिनेगॉग या धार्मिक स्थळाला स्फोटकांनी तसेच बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल २८ डिसेंबर २०२३ रोजी आला होता. ही माहिती प्रार्थना स्थळाच्या विश्वस्तांनी नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्यासह ठाणे बॉम्ब शोधक नाशक पथकाने या धार्मिक स्थळासह संपूर्ण परिसर निर्मनुष्य करुन तीन ते साडे तास तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयित वस्तू किंवा बॉम्ब आढळला नव्हता. याच प्रकरणी गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.