शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

ठाणे पालिकेच्या शाळेमध्ये बेशुद्ध पडलेल्या कुणालचा घातपात?; पालकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 7:16 AM

शाळेने तत्काळ रुग्णालयात नेल्याचा दावा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६४ मध्ये चौथीतील विद्यार्थी  कुणाल शंकर चंदनशिव याचा अचानक बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्याला एका भांडणातून अज्ञात मुलाने छातीवर बसून गळा दाबल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांनी कापूरबावडी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात व्यक्त केला आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी गुरुवारी सांगितले.

कुणालच्या  मृत्यूचे नेमके कारण समजल्याशिवाय आणि संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय मुलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पालकांनी बुधवारी रात्री घेतली होती. गुरुवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन झाले. या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन कापूरबावडी पोलिसांनी दिले. तसेच ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी राक्षे यांनीही  पालिका स्तरावर चौकशी समिती नेमत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पालकांनीही नरमाईची भूमिका घेत कुणालवर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले. 

मानपाडा येथील महापालिकेच्या शाळेत दुपारच्या सुमारास कुणाल अचानक बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध पडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी आणण्याऐवजी तिथेच वेळ वाया घालवला, असा आरोप नातेवाइकांनी केला होता. प्रत्यक्षात कुणाल बुधवारी दुपारी ३:२७ च्या सुमारास पडला. त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात ३:३० वाजता नेल्याचा दावा शिक्षकांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या अधिक तपासातून नेमके कारण समजू शकेल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे