शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
2
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
3
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
4
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
5
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
6
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
7
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
8
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
9
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
10
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
11
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
12
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
13
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
14
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
15
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
16
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
17
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
18
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
19
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
20
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 

ठाणे जिल्ह्यातील मराठा समाजाचे मागासलेपण आता ३४२६ कर्मचारी शाेधणार!

By सुरेश लोखंडे | Published: January 21, 2024 4:25 PM

या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. 

ठाणे : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार आता हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील शहरांसह गांवखेड्यांमधीाल मराठा समाजाचे मागासलेपण शाेधून त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हयात तब्बल तीन हजार १६८ प्रगणक व २५८ पर्यवेक्षक मिळून तब्बल तीन हजार ४२६ प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले आहेत. २३ ते ३१ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील या सर्वेक्षणाचे काम पूर्ण हाेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठा समाजाचे सर्वेक्षण योग्य प्रकारे करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या नोडल ऑफिसर, सहाय्यक नोडल ऑफिसर, तालुकास्तरावर नेमण्यात आलेले प्रशिक्षक त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी अशा एकूण २१ जणांना सुप्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूटमधील तज्ञ प्रशिक्षकांकडून २० जानेवारी रोजी आधीच प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता जिल्ह्यातील शहरांसह गांवखेड्यांमधील मराठा समाजाचे सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.             

या सामाजिक सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले हे प्रशिक्षक रविवारप्रमाणेच २२ जानेवारी रोजी तालुक्याच्या ठिकाणीतालुकास्तरीय प्रशिक्षक,तालुक्यासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी जिल्ह्याभरातील तब्बल तीन हजार १६८ प्रगणक व २५८ पर्यवेक्षक मिळून तीन हजार ४२६ प्रशिक्षित कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त केले आहेत. आयोगाच्या सूचनांनुसार तालुकास्तरीय नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांकडून २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार असून या सर्वेक्षण कामकाजात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेmarathaमराठा