मीरारोड - भाईंदर पूर्वेस रेलसवे स्थानका समोर शास्त्री इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये असलेल्या बॅग बाजार या कंपनीला रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली.
गाळ्यात बॅग बनवण्यासाठीचे ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच मोठा पेट घेतला . महापालिकेच्या अग्निशमन दलास आगीची माहिती मिळतच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. सोमवारी पहाटे सव्वा तिच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश आले. कंपनी चालकांनी दिलेल्या माहिती नुसार आगीत बॅग, कॅनव्हास, कपडे , शिलाई मशीन आदी सुमारे २० लाखांचे साहित्य जळून खाक झाले असून १० लाखांचे साहित्य मात्र वाचवण्यात आल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले.