ठाणे : रस्त्यावरील खड्यांचे काय घेऊन बसलाय बावा, जिल्ह्यातील ११० गांवखेड्यांच्या पाड्यांना रस्तेच नाही. त्यामुळे भिवंडी, शहापूर, मुरबाडच्या दुर्गम भागातील महिलाना प्रसूतीसाठी झोळीत आणावे लागत आहे. त्यात प्रसूतीच्या वेदना असहाय्य झाल्यामुळे त्यां झोळीतच बाळाला जन्म देत आहेत. पण दुर्दैवाने ही बालके जग पाहाण्या आधीच झोळीतच दगावत आहेत. त्यासाठी बुध्दीची देवता म्हणून ओळख असलेल्या गणरायाला निरोप देताना सत्ताधाºयांना रस्त्यांसाठी सदबुध्दी देण्यासाठी मागणी केली. त्यामुळे वर्षभरात रस्त्यांची कामे लागण्याची अपेक्षा असल्याचे श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांकडूल ऐकवले जात आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरच या!. येताना जिल्ह्यातील सत्ताधारी, राजकारण्याचे जिल्हाभरातील या रस्ते नसलेल्या ११० गांवपाड्यांच्या रस्त्याकडे लक्ष देण्याची सद्बुध्दी देते. दिवाबत्तीच्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी त्यांना ताकद देण्याची मागणी गणरायाला निरोप देताना लावून धरल्याचे गांवपाड्यांच्या बहुतांशी गणेश भक्तांनी खड्यांमुळे रस्त्यांच्या दुरावस्थेची माहिती विचारली असता ऐकवले. गणरायाच्या कृपेने वर्षेभरात प्रसूतीसाठी आणणाºया महिलांची झोळीती प्रसूती आणि नवजात बालकांचे मृत्यू टळतील, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नदीतून करावा लागत असलेला जीव घेणा प्रवास सुखकर करण्यासाठी पुलाऐवजी लाकडांचे साकव बांधण्याची तरी सत्ताधाºयांना ताकद दे. पुढच्या वर्षी लवकर ये! अशी विणवणी विसर्जनापूर्वी गणेशाकडे केल्याचे वास्तव जिल्ह्यात ऐकवले जात आहे.
देशात सर्वाधिक प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. देशाची आर्थिक राजधानीला लागून या जिल्हह्याचा विस्तार सागरी, सागरी आणि डोंगरी भागात विस्तारला आहे. गणराया या जिल्ह्यातील ११० गांवपाड्या मात्र रस्तही नाही. तर सहा गांवपाडे आजही दिवाबत्तीपासून वंचित असून अंधारात चाचपडत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपती झाल्या. पण त्यांच्या जीवाभाव्या आदिवासी लोकवस्त्यांना आजही रस्त्यांसह दिवाबत्तीच्या सुशसोयींपासून वंचित राहावे लागत आहे. या मूलभूत गरजां सोडवण्यासाठी गणराया जिल्ह्यातील या राजकारण्यांना सदबुध्दी देऊन या गांवाच्या रस्त्यांसह दिवाबत्तीच्या सोयीसुविधा तुला पुढच्या वर्षी दिसतील अशी सदबुध्दी सत्ताधाºयांना देण्याची आळवणी आदिवासी गांवपाड्यातील गणेश भक्त विसर्जनाच्या आदिल्यादिवशी गणरायाकडे करीत आहेत, असे श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर, सुनील लोणे व शहापूरचे संपर्क प्रमुख, प्रकाश खोडका यांनी लोकमतला सांगितले.
भिवंडी तालुक्याती एका मातेला प्रसूतीसाठी रूग्णालयात झोळीतून नेत असताना तिला झालेल्या जीव घेण्या असहाय्या वेदना, त्यातच तिची झोळीत प्रसूती झाली. तिच्या बाळाकडे डोळेभरून पाहण्याऐवजी त्याचा झाळीतच झालेला मृत्यू माणुकीला काळीमा फासणारा आहे. या तालुक्यातील २८ गांवड्यांना रस्ते नाही. यातील बहुतांशी गांवपाडे विजेपासून वंचित आहेत. रस्ते नसलेल्यांमध्ये भिवंडीच्या दिघाशीजवळील धरमीपाडा,भोईरपाडा,वारेट येथील खडकपाडा, खातीवलीचा सोसायटी पाडा,उसगावचा डॅमपाडा, एकसाल येथील गावदेवीपाडा, देवचोले येथील पेसागाव देवराई, घोटगाव जवळी भोगाडेपाडा, म्हसेपाडा, घाडणे लगतचा इजारीपाडा, म्हाळुंगे ते नवीन गावठाण, तळेपाडा आदी २९ गांवपाडे रस्त्यांपासून आजही वंचित आहेत.
शहापूर हा मुंबईला पाणी पुरवठा करणाºया तालुक्यातही रस्ते नाही. कळंभे बोरशेतीजवळील देवीचापाडा, लोभीपाडा, पोढ्याचापाडाा मोखावणेग्राम पंचातीचा पाटीलवाडी, वारलीपाडा, ढाकणेची कातकरी वाडी मीहीलीचा माळीपाडा, वाघीवाली पिवळी येथील गुरूडेपाडा, हेदूपाडा, जांभुळपाडा. वांद्रे ग्राम पंचायतीचा आलनपाडा, दोडकेपाडा, भवरपाडा. खराडे येथील कातकरी वाडी. अजनूपचा कोळीपाडा, सावरकुट आदी शहापूर तालुक्यातील ६० गांवपाडे रस्त्यांना जोडलेले नाही. याप्रमाणेच मुरबाड कोकाटे पाडात्र कातावळे, न्हावे, बांगरपाडा १८ ते २० गांवपाडे रस्त्याने जोडलेले नाही. तर सहा गांवपा्यात वीज पुरवठा नाही. जिल्ह्यातील या ११० गांवाड्या रस्ते नसल्यामुळे बहुतांशी रहिवाश्यांना व विद्यार्थ्यांना नदीतून जीव घेणा प्रवास करीत शहर जवळ करावे लागत आहे.