ठाणे : घोडबंदररोड वरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्याच्या पहिला बळी गेल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. संभाव्य आपत्ती संदर्भात सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याचदरम्यान अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर काम करण्याच्या सूचना द्या. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यास चांगल्याप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल असेही ते म्हणाले. तसेच, पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशानाचाही आढावा घेत सूचना केल्या.
मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ठाणे जिल्हा आणि शहराशी निगडित विविध यंत्रणांचे, विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी रेल्वे बरोबरही चांगले समन्वय ठेवा. तिन्ही धरणाच्या क्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवा. धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असेल तर गेट उघडण्याबाबत तसेच बंद करण्याबाबत पुर्वकल्पना द्या. धरणावरील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देताना,ज्या गावांचे स्थलांतर रखडले आहे ते तातडीने करा. विशेषतः सावळसे गावाला जागाही दिली आहे. या गावाबाबत सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती होती. तर, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली.
कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भराखड्डे लक्षपूर्वक भरा. खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये याची प्रामुख्याने दक्षता घ्या. त्यातच खड्डे कोल्ड मिक्स पद्धतीने भरण्याबरोबर रस्ते दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणानी याबाबत विशेष काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पुराच्या ठिकाणी जीवितहानी टाळलापूर परिस्थितीवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवा आणि पूर येणाऱ्या भागात जिवीतहानी होऊ नये याची दक्षता घ्या. त्याचबरोबर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवा आणि आवश्यकता पडल्यास त्यांना वेळेत हलवा.तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील लोकांना सावध रहाण्याची सूचना द्या. सुरक्षित स्थळी लोकांची जी व्यवस्था करायची ती चांगलीच करा. राहण्याची - जेवणाची चांगली व्यवस्था करा. असेही म्हटले आहे.
नोडल ऑफिसची नियुक्ती करारेल्वेच्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देताना, मुंबई महापालिकेशी समन्वय राखावा. पाणी साचून सेवा विस्कळित झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी ( नोडल) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बसेस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घ्या अशा सूचना दिल्या. त्यासाठी लोकांना माहिती देण्याची व्यवस्था करा. संपर्क आणि समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करा असे निर्देश दिले.
पालघर जिल्ह्याचाही घेतला आढावा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पालघर अतिवृष्टी मुद्दयांवर चर्चा केली.पालघर जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी चालू आहे तरी लोकांनी काळजी घेण्याच्या सुचना केल्या आहेत. आवश्यक असेल तरच घरातुन बाहेर पडण्याच्या सुचना नागरीकांना दिल्या आहेत. भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्याने नद्या,नाले याची पाण्याची पातळी वाढत आहे. याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच ज्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यावरून गाडी नेण्याचे धाडस न करण्याच्या सुचना दिल्या आहेत
महावितरणालाही सज्ज राहण्याचा सूचना
पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत राहील यासाठी सज्ज रहा. लोकांनी फोन केल्यास त्यांना प्रतिसाद मिळेल याची काळजी घ्या. त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची २४ बाय ७ व्यवस्था करा. त्यावर कार्यवाही करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी, यंत्रणांना आवश्यक सुविधा, उपकरणे तातडीने पुरवण्यात यावीत.