उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील कैलाश कॉलनी, नेताजी चौक, भाटिया चौक, क.बी. रोड, अपला दवाखाना येथील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
यामध्ये प्रामुख्याने MMRDA/मुलभूत सेवा-सुविधा अंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे, पाणीपुरवठ्याची कामे, भुयारी गटार योजनेचे कामे, साफसफाई व बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली इतर रस्ते व नाल्यांची कामे यांची प्रगती व त्या अनुषंगाने नागरिकांच्या असलेल्या तक्रारीची दखल घेऊनप्रत्यक्ष जागेवर जाऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, परमेश्वर बुडगे व इतर उपअभियंता, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण सेवकानी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, महानगरपालिकेचे प्रकल्प सल्लागार तसेच कामाचे कंत्राटदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धुळीचे प्रमाण कमी व्हावे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे, कामाची गुणवत्ता ठेवणे व कामाची गती वाढविणे तसेच काम चालू असतांना "सावधान काम सुरु आहे", असे फलक लावण्याचे महापालिका आयुक्वांनी संबंधितांना निर्देश दिले.