सदानंद नाईक उल्हासनगर : कोमल पार्क इमारतीचा स्लॅब पडून दुरुस्तीचे काम करणारा बेगारी कामगार खलील मोहम्मद याचा मृत्यू झाला. मृत मोहम्मदच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला मिळण्यासाठी नातेवाईकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातल्यावर, प्लॉटधारकाने अवघे दीड लाख देण्याचे सर्वांसमोर कबूल केले.
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून गुरवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान गोल मैदान येथील कोमल इमारतीचा स्लॅब कोसळून दुरुस्तीचे काम करणारा बेगारी कामगार खलील मोहम्मद याचा मृत्यू झाला. तो बिहार येथील राहणारा असून त्याच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असल्याची माहिती नातेवाईक व गाववाल्यानी पत्रकारांना दिली. बिहार येथील गावी मृतदेह नेण्यासाठी मोठा खर्च येत असून एवढा खर्च कसा करणार?. असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. तसेच त्यांनी मोहम्मद यांना नुकसान भरपाईची मागणी प्लॉटधारक यांच्याकडे केली. हा सर्व प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर व पत्रकार यांच्या उपस्थित झाला.
मृत खलील मोहम्मद यांच्या नातेवाईकांनी व गाववाल्यानी नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा शुक्रवारी घेतल्यावर, वातावरण तणावग्रस्त झाले होते. दुर्घटनाग्रस्त झालेल्या प्लॉटधारक महिलेच्या भावाने आमच्याकडे दिड लाख असून तेवढेच पैसे देणार असल्याचे सांगितले. तर नातेवाईकांनी अड्डीच लाखाची मागणी केली. हा सर्व प्रकार उल्हासनगर पोलीस ठाणे व पत्रकारांच्या समोर झाला. इमारत दुर्घटनेतील एका मृताची किंमत दीड लाख ठरत असल्याने, अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शहारतील धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे. दुर्घटनाग्रस्त कोमल इमारत गुरवारी सील केल्याने, त्यातील नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य, कपडे, पैसे, दागिने घरातच असल्याचें बोलत होत होते. याबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना याबाबत विचारले असता, त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे म्हणाले.