शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

प्रशासनाने परिवहन सेवेचा केलेला ठराव योग्यच; शासनाला दिला अहवाल

By धीरज परब | Published: December 12, 2022 7:05 PM

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सर्वसाधारण ५९ बस तर १० मध्यम आकाराच्या व ५ वातानुकूलित बस अश्या एकूण ७४ बस आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा जीसीसी तत्वावर चालवण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय हा शासनाची मार्गदर्शक तत्वे व कायदयानुसार योग्यच असल्याचा अहवाल आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला आहे. त्यामुळे शासन त्या नुसार काय निर्णय घेते ह्या कडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सर्वसाधारण ५९ बस तर १० मध्यम आकाराच्या व ५ वातानुकूलित बस अश्या एकूण ७४ बस आहेत. शिवाय नवीन इलेक्ट्रिक बस प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहेत . त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने मार्च २०२२ मध्ये पालिकेच्या सध्याच्या ७४ बस व नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बस ह्या जीसीसी पद्धतीने चालवण्यास तसेच तिकीट संकलन आदी साठी धोरण ठरविण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव तत्कालीन महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या कडे महासभेच्या मंजुरीसाठी दिला होता.

मे २०२२च्या महासभेत नगरसेवकांनी ७४ बस साठी एनसीसी तत्वावर ठेकेदार नेमावा व इलेक्ट्रिक बस साठी जीसीसी तत्वावर ठेकेदार नेमावा असा ठराव मंजूर केला होता . एकाच पालिकेच्या परिवहन सेवेसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीने ठेकेदार नेमल्यास अडचणी व तक्रारी वाढण्याची शक्यता पाहता ऑगस्ट मध्ये नगरसेवकांची मुदत संपल्यावर प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात प्रशासकीय ठराव करून सर्व बस जीसीसी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला . त्या अनुषंगाने प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरु केली.

माजी स्वीकृत सदस्य भगवती शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. पालिका प्रशासन हे लोकप्रतिनिधी यांनी मंजूर केलेल्या ठरावाला बदलून बेकायदा निर्णय घेत असल्याचा दावा करत प्रशासनाने चालवलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी  शर्मा यांनी याचिकेद्वारे केली. त्यावर न्यायालयाने , राज्य शासनाच्या नगरविकास विभागास निर्णय घेण्यास सांगतानाच नगरविकास विभागाचा निर्णय येई पर्यंत ठेकेदारास कार्यादेश देऊ नये असे आदेश दिले होते. 

महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी नगरविकास विभागाला या बाबतचा अहवाल नुकताच सादर केला आहे . इलेक्ट्रिक बस ह्या जीसीसी पद्धतीने चालवण्यास द्याव्यात अशी केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे आहेत . तर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या सल्लागारने दिलेल्या अहवाला नुसार एनसीसी पद्धती ऐवजी जीसीसी पद्धतीची शिफारस केली आहे .दोन वेगवेगळ्या पद्धती ऐवजी सर्व बस एकाच जीसीसी पद्धतीने देण्याचा निर्णय हिताचा असल्याने शासनाची मार्गदर्शक तत्वे व कायदयानुसार योग्यच असल्याचे ठाम मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर