ठाणे: सात जणांचा बळी घेणारी लिफ्ट गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त होती. तरीही तिचा वापर सुरुच होता. रविवारीही तिचा वापर सुरु असतांना मोठयाने आवाज करीत ती थांबून थांबून चालत होती. अशी नादुरुस्त लिफ्ट चालविल्याने लिफ्टचा ठेकेदार आणि मजूर ठेकेदार तसेच इतररांविरुद्ध सात जणांच्या मृत्यूप्रकरणी हलगर्जी केल्याचा तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी दिली.
बाळकूमच्या ढोकाळी येील रुणवाल आयरिन सी या ४० मजली इमारतीच्या ३८ व्या मजल्यावरुन सामान ने- आण करणारी लिफ्ट कोसळून हारुण शेख या लिफ्ट चालकासह सात जणांचा १० सप्टेंबर रोजी सायंकाळी मृत्यू झाला. या अपष्घातामध्ये मृत्यू पावलेल्या मंजीस दास याचा भाऊ दशरकुमार दास (२८, मजूर, रा. ठाणे, मुळ रा. समस्तीपूर, बिहार) याने कापूरबावडी पोलिस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान आयरीन सी या टॉवरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य आणि मजूरांना ने आण करण्यासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट ही गेल्या तीन महिन्यांपासून वेळोवेळी नादुरुस्त झाली होती. तरीही दुरुस्त करुन तिचा वापर करणे चालू होते. लिफ्ट नादुरुस्त असल्याचे आणि ती चालविल्यानंतर अपष्घात होऊन जिवितहानी होऊ शकते, याची माहिती असतांनाही कामगारांची कोणत्याही प्रकारची काळजी न ष्घेता, लिफ्टचे ठेकेदार आणि मजूर ठेकेदार तसेच इतरांनी नादुरुस्त लिफ्टचा जाणीवपूर्वक वापर केला. त्यामुळेच ४० व्या मजल्यावरुन मजूरांना ष्घेऊन खाली येत असलेली लिफ्ट तुटून खाली जमिनीवर बेसमेंटमध्ये जोरात आपटल्याने लिफ्ट चालकासह सात जणांचा मृत्यू झाला.
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात-
लिफ्टच्या अपष्घातात सात जणांचा बळी गेल्याने सातही मृतदेहांची ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी दुपारी हे सातही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बिहार ये नातेवाईकांनी नेल्याचे पोलिसांनी सांगितले.
नातेवाईकांना १० लाखांची मदत
या दुर्ष्घटनेत मृत पावलेल्या सात मजूरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत संदीप रुणवाल या विकासकाने जाहीर केली. वापरण्यात येणारी लिफ्ट सुस्थितीत असल्याचा दावाही रुणवाल यांनी केला आहे.