शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

हिंदुत्वाचा तेजोमय वारसा; ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:12 IST

विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा पहिला आणि एकमेव बॅनर आहे.

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत वेगळी भूमिका घेतल्यानंतर सर्वात आधी ठाण्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हादरा बसला. याठिकाणी बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. परंतु एकमेव ठाण्याचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. त्यात शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाण्यात शिवसेनेला खिंडार पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी एकवटले. 

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आम्ही भाजपाशी युती केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्ववादी वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत आहेत. त्यात आता ठाण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा पहिला बॅनर झळकला आहे. या बॅनरची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. खासदार राजन विचारे यांनी हा बॅनर लावला आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा तेजोमय वारसा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 

ठाण्यातील तलावपाळी परिसरातील जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा पहिला आणि एकमेव बॅनर आहे. ठाणे खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर हिंदुत्वाचा तेजोमय वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे, आदित्य ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

खासदार श्रीकांत शिंदेंनी शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपसोबत आले आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सांगितले. महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू. मुख्यमंत्री शिंदेंच्या धाडसाचं कौतुक करत एकनाथ शिंदे हे मर्द मराठा आहेत, छत्रपतींचा मावळा अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. खासदार श्रीकांत शिंदेंनी फडणवीसांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा हे सरकार येईल, असं कुठेही ठरलं नव्हतं. त्यामुळे, एवढे लोकं, आमदार सोबत येतील हे त्यांनाही माहिती नव्हतं. कदाचित असंही घडलं असतं, जर हे सगळे लोकं सोबत नसते आले. तर, एकनाथ शिंदेंचं सामाजिक-राजकीय जीवन आहे, इतक्या वर्षांची पुण्याई समाप्त करण्यात आली असती. पण, त्यांनी याचा विचार केला नाही, त्यांनी हे ठरवलं की मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे, अशा शब्दात फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे