शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

जखमी झालेल्या ढवळी आणि गोकुळीची झाली ताटातूट; ग्रामस्थ हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 9:31 AM

उपचारासाठी नेले भिवंडीच्या गोशाळेत : विहिगावात वाहिल्या अश्रुधारा

विशाल हळदे ठाणे : खड्ड्यात पडून जखमी झालेली कसारानजीकच्या विहिगावातील गाय, ढवळी हिला उपचारासाठी गुरुवारी भिवंडी येथील गोशाळेत नेण्यात आले. पाच दिवसांपूर्वीच तिने गोकुळीला जन्म दिला होता. उपचारासाठी ढवळीला भिवंडी येथे नेणे गरजेचे असल्याने मायलेकीची ताटातूट झाली अन् संपूर्ण विहिगाव शोकाकुल झाले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील विहिगाव येथील तेलम कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली ढवळी गाय १५ दिवसांपूर्वी खड्ड्यात पडून जखमी झाली. कमरेचे हाड मोडल्याने तिला उभे राहता येत नाही. अपघात झाला त्यावेळी ती गाभण होती. पाच दिवसांपूर्वी तिने जखमी अवस्थेतच गोकुळीला जन्म दिला. मात्र गोकुळीला दूध पाजण्यासाठीही तिला उभे राहणे शक्य नसल्याने तिच्यावर उपचार करणे गरजेचे झाले होते. त्यामुळे तिला गुरुवारी भिवंडी येथील गोशाळेत रवाना करण्यात आले.

पशुवैद्य डाॅ. सचिन म्हापणकर यांनी ढवळीची प्राथमिक तपासणी केली. एकाच जागेवर बसून तिला लकवा होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अपघातामुळे तिच्या मागच्या पायांमध्ये त्राण राहिलेले नाही. त्यामुळे मोठ्या झोपाळ्यात बसवून तिच्या पायाला नियमित माॅलिश करणे गरजेचे आहे. अवघ्या पाच दिवसांच्या वासरापासून ढवळीला वेगळे करणे कुणालाही आवडणार नाही. मात्र योग्य उपचारासाठी त्याशिवाय पर्याय नसल्याचे मत डाॅ. म्हापणकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, ढवळीची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन घरी यावी अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. गोकुळीची तिची भेट व्हावी असेच सगळ्यांना वाटत आहे. 

ग्रामस्थ हळहळलेभिवंडी येथील पडघ्याजवळ असलेल्या आगाव येथील गोपाळ गोशाळेत गुरुवारी ढवळीला नेले जात असताना संपूर्ण विहिगाव हळहळले. तेलम कुटुंबीयांतील महिला भावुक होऊन रडू लागल्या. ढवळीला ट्रकमधून नेताना अनेकांनी तिच्या अंगावरून हात फिरवला.