शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

वृद्ध भावांची हत्या करणारा मनोरुग्ण नाही, खरे कारण शोधणे पोलिसांपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 1:57 PM

या प्रकरणात ३० वर्षीय आरोपी किशोरकुमार जगन्नाथ मंडल याला पालघर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालघर :  तारापूर मोठे कुडन येथील दोन भावांची निर्घृण हत्या करणारा आरोपी हा मनोरुग्ण नाही, हे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. मात्र, निर्घृणतेचा कळस गाठणाऱ्या या हत्याकांडामागचे खरे कारण शोधण्याचे प्रयत्न पालघर पोलिस करत आहे. या प्रकरणात ३० वर्षीय आरोपी किशोरकुमार जगन्नाथ मंडल याला पालघर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तारापूर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या कुडण येथील निवृत्त शिक्षक भीमराव पाटील (८४) आणि मुकुंद पाटील (९२)  या दोन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. एका मनोरुग्णाने हे हत्याकांड केल्याचे या घटनेतील प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या जितेश पाटील याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून तपास सुरू केला. तारापूर खाडीत आरोपी लपून बसला होता. 

हत्येमागचे कारण काय?भीमराव पाटील यांनी शेतातील झाडाखाली झोपलेल्या आरोपीला हटकून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्या शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेली कुदळ उचलून भीमराव यांच्या डोक्यात अनेक प्रहार केले. दरम्यान, भावाच्या शोधात आलेल्या मुकुंद पाटील यालाही त्याने ठार केले.

अशा प्रकारे केली अटकखाडीतील चिखलात लपला असताना आराेपीच्या हातातील पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर बॅटरीचा प्रकाशझोत पडल्यात तो पोलिसांना निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या तोंडात चिखल आणि पोटात दीड लिटर पाणी गेल्याची माहिती वैद्यकीय तपासात समोर आली. शनिवारपासून आरोपी पोलिसांनी विचारलेल्या माहितीला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने तो मनोरुग्ण नसल्याचे निष्पन्न झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस