ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून वातवरणात झालेल्या बदलामुळे उन्हाचा पारा चढला आहे. त्यात मागील दहा दिवसापासून उन्हाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेल्याचे दिसून येत आहे. तर, त्यात मागील आठवड्यात बुधवारी ठाणे शहरातील पार थेट ४३.३ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. तर बुधवारी पुन्हा ४२.२७ अंश सेल्सियस तापमान होते. या वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या.
२०२२ मध्ये होळीच्या दुसऱ्याच १७ (मार्चला) दिवशी ठाणे शहराचे तापमान ४५.६ अंश सेल्सिअसने वधारला होता. यंदा फेब्रुवारी २०२३ च्या १९ आणि २३ या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्या कालावधीत तापमानाचा पारा १९ फेब्रुवारीला ४१.९ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पुन्हा तापमानाचा पारा हा ४१.८ अंशावर गेला होता. होळीनंतर हे तापमान वाढण्याची शक्यता होती. त्याचवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याच्यानंतर ही ठाण्यात अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला होता.
याचदरम्यान मेघ दाटून येत असल्याने तापमानही ३५ अंशाच्या आसपास होते. मात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा अचानक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात ९ एप्रिलला तापमान ४१ अंशावर गेले. त्यानंतर तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले. त्यात १२ एप्रिलला ४३.३ इतकी वाढ झाली होती. त्यानंतर १३ तारखेला काही अंशी घट झाल्याचे दिसून येत असताना, शुक्रवारी पुन्हा त्यात वाढ झाली आहे.
शुक्रवारी १४ एप्रिल रोजी पाऱ्याने उसळी घेत ४३.१ अंश सेल्सिअस वर उडी मारली. त्यामुळे एप्रिलच्या महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत.दरम्यान, ठाणे शहरात १५ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत तापमान ३७ अंश सेल्सियस ते ३७.७ अंश सेल्सियसपर्यंत स्थिर असल्याचे दिसून येत आहे. तर, मंगळवार १८ एप्रिलला पुन्हा तापमानात वाढ होवून तापमान ४२.८ अंश सेल्सियस वर पोहोचला आहे. या वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
ठाण्याचे असे होते तापमानतारीख - तापमान९ एप्रिल - ४१.००१० एप्रिल - ४२.१११ एप्रिल - ४२.८१२ एप्रिल - ४३.३१३ एप्रिल - ४१.७१४ एप्रिल - ४३.११५ एप्रिल - ३७.११६ एप्रिल - ३७.११७ एप्रिल - ३७.७१८ एप्रिल - ४२.८१९ एप्रिल - ४२.२७