शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Mira Bhayander: वरसावे येथील खाडीवरचा नवीन ५ पदरी उडडाणपूल फेब्रुवारी-मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

By धीरज परब | Published: November 30, 2022 2:23 PM

Mira Bhayander: गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे .

 - धीरज परब 

मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे . खाडी वरील मुंबई कडून वसई - सुरत कडे जाणारा नवीन ५ पदरी उड्डाणपूलचे काम बहुतांश झाले असून पुढील वर्षात फेब्रुवारी अखेर किंवा मार्च मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

वसई खाडी वर दोन पूल आहेत . एक जुना पूल कमकुवत झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पूल बंद ठेवावा लागत होता . त्यावरून अवजड वाहनांना मनाई केली गेली तर धीम्या गतीने वाहने जात असल्याने मोठी वाहनकोंडी होऊ लागली . पावसाळ्यात जुन्या पुलांवर खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत .  देशाच्या मुख्य राष्ट्रीय महामार्गची अशी बिकट परिस्थिती झाल्याने संताप व्यक्त होत होता.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५ पदरी नवीन पूल बांधण्यासाठी डिसेंबर २०१६ ला निविदा काढून मार्च २०१७ ला कार्यादेश दिले .  मात्र महत्वाच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या त्यामुळे आणि नंतर २०२० सालात कोरोना लागल्याने पुलाचे काम रखडले . पुलाचे काम रखडल्याने येथील वाहतूक कोंडी मुळे नागरिक मात्र रडकुंडीला आले आहेत.

ह्या ठिकाणी नवीन पूल पाच पदरी असल्याने त्या नव्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून  वसई व पुढे गुजरात  दिशेला जाणारी वाहनं जातील . तर सध्याचा जुना व दुसरा सुमारे १७ वर्षां पूर्वी बांधलेल्या पुला वरून मुंबई - ठाणे कडे जाणारी वाहनं धावतील . मुंबई - मीरा भाईंदर वरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहनं हि उड्डाणपुलाखालून जातील . त्याच प्रमाणे ठाण्या वरून वसई - गुजरात कडे जाणारी वाहनं नवीन उडडाणपुलाला जोडणाऱ्या पुला वरून  जातील.

सध्या केवळ नवीन ५ पदरी पूल हा फेब्रुवारी - मार्च दरम्यान पूर्ण होऊन तो आधी वाहनांसाठी खुला केला जाणार आहे . त्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून येणारी व वसई - गुजरात दिशेला जाणारी वाहनं जाणार आहेत . त्यामुळे सध्या वरसावे नाका येथे एकाच जुन्या पुलावरून वसई दिशेने जाणाऱ्या वाहनां मुळे होणारी कोंडी फुटणार आहे.

नवीन पूल सुरु झाल्या नंतर ठाणे वरून वसई - गुजरात दिशेला जाणाऱ्या पुला साठी मोठी अडचण प्राधिकरण व वाहतूक पोलिसांना भेडसावणार आहे . कारण वरसावे नाक्यावर सदर काम करताना वसई - गुजरात वरून ठाण्याला जाणारी तसेच ठाण्या कडून वसई दिशेला जाणारी वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे . तसेच अन्यत्र वळवावी लागणार आहे असे सूत्रांनी सांगितले .

वरसावे नाका येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासह पुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय मंत्रालया कडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे . नवीन उड्डाणपूल नवीन वर्षात फेब्रुवारी वा मार्च पर्यंत नागरिकां साठी खुला करण्याचे प्राधिकरणा कडून आश्वस्त केले गेल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर