भिवंडी न्यायालयातील राहुल गांधींवरील दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिलला

By नितीन पंडित | Published: March 4, 2023 08:48 PM2023-03-04T20:48:31+5:302023-03-04T20:49:55+5:30

शनिवारी भिवंडी जलदगती न्यायालयात झाली सुनावणी

The next hearing of the case against Rahul Gandhi in the Bhiwandi court is on April 1 | भिवंडी न्यायालयातील राहुल गांधींवरील दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिलला

भिवंडी न्यायालयातील राहुल गांधींवरील दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिलला

googlenewsNext

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या  केली असे वक्तव्य केले होते.या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.या याचिकेवर शनिवारी भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी झाली.दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल.सी.वाडीकर यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.

सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे ऍड नंदू फडके यांनी बाजू मांडली,तर खासदार राहुल गांधी यांची बाजू ऍड नारायण अय्यर यांनी मांडली.ऍड अय्यर यांनी सांगितले  की, खासदार राहुल गांधी दिल्लीचे रहिवासी असून लोकसभा सदस्य आहेत, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत वकील त्यांचे प्रतिनिधित्व करतील आणि खटला पुढे चालवतील, या आधारावर कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून आज न्यायालयात युक्तिवाद झाला.यावर १ एप्रिल २०२३  रोजी युक्तिवाद  केला जाईल, तसेच सदरच्या पुढील सुनावणीसाठी दोन्ही पक्षकार सज्ज असून या दाव्या बाबात अधिक माहिती पुढील सुनावणीवेळी देणार असल्याचे  राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले.

Web Title: The next hearing of the case against Rahul Gandhi in the Bhiwandi court is on April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.