शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

प्रभाग रचनेच्या नव्या समीकरणांमुळे ठाण्यात नगरसेवकांची संख्या ११ ने कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 3:37 PM

अनेकांचे अवसान गळाले, २०१७ चे समीकरण होणार तयार, प्रभागही वाढणार नाही

ठाणे : राज्यात सत्तापरिवर्तन होताच महापालिका निवडणुकांचे गणित पुन्हा एकदा बदलण्याची नांदी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मिळाली आहे. नवीन निर्णयानुसार लोकसंख्येनुसार पुन्हा नव्याने प्रभागरचना बदलणार आहे. त्यानुसार ठाणे  महापालिकेची आगामी निवडणूक त्रीसदस्य अशी न होता २०१७ सालच्या पॅटर्ननुसार चार सदस्य पॅनलपद्धतीने होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार प्रभाग रचना ४० हजार लोकसंख्येनुसार वाढणार आहे. परंतु त्यामुळे नगरसेवकांची संख्या पुन्हा ११ ने कमी होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेत १४२ नाही तर २०१७ प्रमाणे १३१ नगरसेवक निवडुन जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली. त्यामुळे नव्याने निवडणुका लढविण्यासाठी सज्ज असलेल्यांचा आशा मात्र यामुळे मावळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.                  

ठाणे महापालिकेची मुदत संपून आज पाच महिने पूर्ण झाले असून संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हाती आहे. हा अवधी आणखी वाढू नये यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्र म जाहिर केला. सर्वप्रथम एक पॅनलपद्धतीने निवडणूक घेण्याच्या सुचना करण्यात आल्या. परंतु त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता असल्याने तत्कालीन ठाकरे सरकारच्या मंत्नीमंडळ बैठकीत २००२ सालच्या पॅटर्ननुसार त्नीसदस्य पॅनल पद्धतीने निवडणूका घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार निवडणूक आयोगही कामाला लागले. दिलेल्या कार्यक्र मानुसार प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार याद्या असे सर्व सोपस्कार पार पडल्याने लवकरच निवडणुकांचा धुरळा उडेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्न राज्यात पुन्हा सत्तापरिवर्तन झाल्याने आता महापालिकांच्या निवडणुकांचे गणित बदलणार आहे. शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमुळेच ही राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

आधीच्या प्रभाग रचनेनुसार म्हणजेच त्री सदस्यीय पॅनल प्रमाणो महापालिकेवर ४७ प्रभागातून १४२ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार होते. परंतु आता काहीशी समीकरणे बदलली असल्याने पुन्हा २०१७ प्रमाणो  ठाणे  महापालिकेवर  आता १३१ नगरसेवकच निवडून जाणार आहेत. तर प्रभाग देखील ४७ वरुन ३३ होण्याची शक्यता आहे. तर ३३ मधून एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असणार आहे. याशिवाय नव्याने कुठेही प्रभागांची वाढ होणार नसल्याचेच चित्र सध्या यामुळे दिसत आहे.  त्यामुळे नव्याने निवडणुका लढविण्याची तयारी करणाऱ्यांची या समीकरणामुळे घोर निराशा होणार आहे.शासन निर्णयानुसार १२ लाखांपर्यंत नगरसेवक संख्या ११५ इतकी असेल असे सांगण्यात आले आहे. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार इतक्या अधिक लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतुद करण्यात आली आहे. यानुसार १२ लाख लोकसंख्या वगळून उर्वरीत ६ लाख ४१ हजार ४८८ लोकसंख्येतून १६ अतिरिक्त नगरसेवक निवडुण येणार आहेत. ११५ आणि १६ अशी एकूण १३१ इतकी नगरसेवक संख्या होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका