शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

ठाण्यात मतदारांची संख्या वाढली; १३ लाख ४६ हजार मतदार, १ लाख १७ हजार नवीन मतदार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:17 AM

कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तसेच लोकसंख्येची गणनादेखील झालेली नाही. त्यामुळे २०११ चा निकष धरून तीच लोकसंख्या गृहीत धरावी, असे सांगण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे  महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये काहीशी भर पडणार असल्याचे दिसत आहे. सध्या महापालिका हद्दीत १ लाख १७ हजार नवीन मतदार वाढले असल्याची माहिती पुढे आली आहे. निवडणुका आणखी पुढे गेल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या १३ लाख ४६ हजार मतदारांची नोंद झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तसेच लोकसंख्येची गणनादेखील झालेली नाही. त्यामुळे २०११ चा निकष धरून तीच लोकसंख्या गृहीत धरावी, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसारच प्रभागांची रचना करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी म्हणजेच घोडबंदर, कळवा, दिवा आदी भाग हे मागील काही वर्षांत वाढले आहेत. त्यामुळे या भागातील काही प्रभाग मोठे झाले आहेत. भविष्यात पुन्हा लोकसंख्येची गणना झाल्यानंतर हे प्रभाग छोटे होऊन प्रभागांच्या संख्येत वाढ होईल. सध्या मात्र तसे चित्र दिसणार नाही. ठाणे महापालिकेच्या हद्दीत नव्या १ लाख १७ हजार मतदारांची वाढ झाल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा आकडा १३ लाख ४६ हजार इतका झाला आहे. मतदार वाढल्याने राजकीय पक्षांची चिंता वाढणार आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिका हद्दीत १८ लाख ४१ हजार ४८१ इतकी लोकसंख्या नोंदवली गेली होती. आता ती तीस लाखांच्या आसपास पोहोचली आहे. २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२ लाख २८ हजार ६०२ इतक्या मतदारांची नोंद होती. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ६७ हजार ५०४,  तर ५ लाख ६१ हजार ८७ इतक्या महिला मतदारांसह अवघ्या १५ अन्य मतदारांचा समावेश होता. 

 नेते मंडळींना फुटणार घामयंदाही मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये नव्याने नावे नोंदविणाऱ्यांच्या संख्येबरोबरच १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात नव्या मतदारांची संख्या १ लाख १७ हजार  ३९४ इतकी वाढली आहे. वाढत्या मतदार संख्येमुळे सदस्य संख्या वाढली आणि प्रभागही वाढले आहेत. या वाढत्या मतदारांमुळे नेतेमंडळींना घाम फुटणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका