मीरारोड - मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींचे व्हॉट्सअप द्वारे फोटो पाठवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी पुरवणाऱ्या तृतीयपंथी दलालास मीरारोड मधून अटक करण्यात आली आहे .
मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना विश्वासनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, तृतीयपंथी महिला वेश्यादलाल नितु उर्फ संजना सिंह रा. अंधेरी, मुंबई हि फोटोशुट व मॉडेलींग करणाऱ्या तरुणींची छायाचित्रे पुरुष गि-हाईकांशी संपर्क साधून ती व्हॉट्सअप वर पाठवते . मुंबई व मीरा भाईंदर परिसरात आंबटशौकीन गिऱ्हाईकास लॉज मध्ये खोली बुक करायला लावून पैश्यांच्या मोबदल्यात वेश्या व्यवसाय साठी तरुणी पाठवत असल्याने पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक मार्फत तिच्याशी संपर्क केला .
नितु सिंह हिच्यासाठी मीरारोडच्या शिवार उद्यान जवळील वर्धमान फॅन्टसी समोर सापळा रचला. तिने बोगस गि-हाईकास फोटोशुट व मॉडेलींग करणारी मुलीचे फोटो पाठवुन एका तरुणीस वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत वेश्यागमनाच्या मोबदल्यात रक्कम ठरवली . ती रक्कम गिऱ्हाइका कडून स्वीकारल्याने तिला अहिरराव सह उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, केशव शिंदे, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे, अश्विनी वाघमारे यांच्या पथकाने ताब्यात घेतले . तिच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तर एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे .