शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

चिंचणीच्या सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडले; पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 8:47 PM

पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पो नि. स्वपन बिश्वास ह्याच्या नेतृत्वाखाली टीमने अटक केली.

- हितेंन नाईकपालघर: डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे अत्यंत वादग्रस्त ठरलेले आणि त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची सतत मागणी होत असलेल्या उच्चशिक्षित सरपंच कल्पेश धोडी याला आज बोईसरच्या एका हॉटेलात 20 हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

चिंचणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक नवीन चेहरा, सुशिक्षित उमेदवारांची आवश्यकता असल्याने शिवसेनेने मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या कल्पेश धोडी या तरुण उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले होते.परंतु अल्प कालावधीत अनधिकृत कामांना परवानगी,  घरपट्टी घोटाळा, ग्रामपंचायत निधी गैरकारभार आदी आपल्या वादग्रस्त कारभाराने त्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले.

कल्पेश धोडीवर विरोधी पक्षांसह आपल्याच पक्षातील सदस्यांनी ही भ्रष्टाचाराचे आरोप करून त्याच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अविश्वास ठराव ही दाखल केले आहेत. मासिक सभा, ग्रामसभेत छुप्या पद्धतीने ठराव घेत बेकायदेशीर कामाला प्रोत्साहन देत असल्याचे अनेक आरोप त्याच्यावर करण्यात आले होते.

तक्रारदार मोहम्मद चुनावाला ह्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चिंचणी येथे खरेदी केलेल्या जमिनीवर बांधकाम करणे आणि त्यावर उभ्या असलेल्या स्मशानभूमी हटविण्यासाठी सरपंच धोडी यांनी १४ लाख ५० हजाराची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पहिल्या हफत्यामधील ४ लाख ५० बाजारातील  २० हजाराची रक्कम बोईसरमधील मधुर हॉटेलमध्ये स्विकारताना सरपंच धोडी याला पालघरच्या लाचलुचपत विभागाने त्याला अटक केली. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पो नि. स्वपन बिश्वास ह्याच्या नेतृत्वाखाली टीमने अटक केली.

टॅग्स :palgharपालघरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग