अंबरनाथ - प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भावी अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची संख्या ही तिपटीने वाढली आहे.
अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराचा ब्रॅण्डिंगसाठी शिव मंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात येते. या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमुळेच सर्व भाविकांच्या दृष्टिक्षेपात हे मंदिर आल्यामुळेच श्रावणात तिप्पट गर्दी होत असल्याची बाब समोर आली आहे. अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर देशभरात प्रसिद्ध करण्यासाठी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात येते. या आर्ट फेस्टिवलमुळे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक कलाप्रेमी या ठिकाणी येत आहेत.
यासोबतच या मंदिराची ब्रॅण्डिंग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भाविकांचा ओढा देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी देखील शिव मंदिरात गर्दी होत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून श्रावणात जी गर्दी होत आहे ते पाहता केवळ अंबरनाथ नव्हे तर ठाणे मुंबईवरून देखील मोठ्या प्रमाणात भावीक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. आज श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी प्राचीन शिव मंदिराच्या प्रांगणात झाली होती मंदिराची रांग शिव मंदिराच्या प्रवेशद्वारा बाहेर गेली होती. एवढ्या प्रचंड गर्दीत देखील भाविकांचा उत्साह मात्र किंचितही कमी झाला नव्हता.
सोशल मीडियावर शिवमंदिर ट्रेनिंगमध्ये: गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात शिवमंदिराचे रिल्स प्रसारमाध्यमांवर येत आहेत. त्यामुळे या मंदिराची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भाविक या ठिकाणी रिल्स काढून सोशल मीडियावर टाकत असल्यामुळे भाविकांचा ओढा वाढत आहे.
आमदारांनी घेतले दर्शन: पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनिकर यांनी देखील महादेवाचे दर्शन घेतले यानंतर आलेल्या भाविकांसोबत देखील त्यांनी चर्चा केली.
मंदिराच्या प्रांगणात श्रावणोत्सव: प्राचीन शिव मंदिराचे पारंपरिक पुजारी विजय पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून मंदिराच्या प्रांगणात महिनाभर श्रावण उत्सव आयोजित करण्यात येत आहे या श्रावण उत्सवांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे.