ठाणे : येथील कळवा परिसराचे सध्या माेठ्याप्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्यातील पारसिक नगर या सुनियोजित परिसरातील फूटपाथ महापालिकेच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे तब्बल एक वर्षापासून अंधारात आहे. या विजेच्या पाेलवरील विद्युूत पुरवठा खंडीत असल्यामुळे या परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले राहत असल्यामुळे रहिवाश्यांमध्ये संताप व्यक्त आहे.
या परिसरातील नागरिकांना ठाणे मनपाकडून मुबलक सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे साेइस्करपणे दुलक्ष केले जात असल्याची चचार् आहे. या परिसरातील कळवा नाका,सह्याद्री शाळेपासून मुंब्रा सर्कलपर्यत दोन्ही बाजुच्या फूटपाथ वीजेचे पाेल उभे आहेत. या फूटपाथवरून येजा करणार्या पादचारी प्रवाश्यांना या वीज पुरवठ्याचा लाभ हाेताे. पण गेल्या वषेर्भरापासून या पाेलवरील वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे त्यावरील दिवे प्रकाश देत नसल्याची चचार् रहिवाश्यांमध्ये आहे. या फूटपाथवर अंधाराचे साम्राज्य पसरात असल्यामुळे परिसरातील व मुब्रा भागातील रहिवाशी सायंकाळपासूनच या फूटपाथवरील येजा बंद करीत असल्याचे वास्तव आहे.
या पाेलवरील विद्यूत पुरवठा खंडीत केलेला असल्यामुळे महिलां, वयोवृद्ध, लहान मुले नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या निसगार्च्या सानिध्यातील या फूटपाथवरून परिसरात रहिवाशी, जेष्ठ नागरिक संध्याकाळी फेरफटका मारायला निघतात. पण अंधार हाेण्याच्या आत त्यांना घर गाठावे लागत आहे. या अंधारामुळे रस्त्याने चालताना अपघात व साखळी चोरी चे प्रकार घडत असल्याची गंभीर समस्या या परिसरातील रहिवाश्याना भेडसावत आहे. त्याविराेधात तीव्र संताप आहे.