शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आनंदाश्रमाजवळील टेंभी नाक्याच्या शाळेला ना छप्पर, ना प्रयोगशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 9:13 AM

पालिकेच्या शाळा की कोंडवाडे...

प्रज्ञा म्हात्रेठाणे : टेंभी नाका ठाणेकरांचा मानबिंदू. स्व. आनंद दिघे यांचा आनंदाश्रम व त्यांची समाधी येथेच आहे. येथून हाकेच्या अंतरावर ठाणे महापालिकेची १७ क्रमांकाची शाळा आहे. ही शाळा आहे की कोंडवाडा, असा प्रश्न शाळा पाहिल्यावर पडताे. 

शाळेत तळमजल्यावर गुजराती, तर पहिल्या मजल्यावर मराठी माध्यमाची शाळा भरते. तेथे सिमेंट काँक्रिटचे छप्पर नाही. पत्रे टाकले आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही उकाड्याने विद्यार्थी त्रस्त होतात. उन्हाळ्यात वर्गात बसणे ही तर शिक्षाच. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांना बसायला शाळेत स्वतंत्र व्यवस्था नाही. शाळेत प्रयोगशाळा नाही. इमारतीमधील जवळपास प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये जुने, तुटके बेंच, टेबल, खुर्च्या व वेगवेगळे भंगार सामान टाकून ठेवले आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शाळेची ही दुरवस्था. 

लाखाेंची विद्यार्थी संख्या हजारात आलीठाणे महापालिका शाळांचा दर्जा मात्र खालावत चालला आहे. महापालिका शाळांतील पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, शाळांची दुरवस्था प्रचंड वाढली आहे. ठाणे महापालिकेच्या शाळा १३० आहेत. पूर्वी लाखोंच्या संख्येने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम २७ ते २८ हजारांच्या आसपास आली आहे. एका इमारतीत एकापेक्षा अधिक शाळा चालविल्या जातात. पटसंख्या कमी होत असली तरी शाळा दुरुस्तीचा खर्च वाढतच चालला आहे. 

विद्यार्थी गुणवान; पण शाळांची स्थिती दयनीयसमर्थ भारत संस्थेने २००८-०९ साली ठाणे महापालिका शाळांची पाहणी केली. त्यावेळी लक्षात आले की, विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहेे; पण शाळांची परिस्थिती वाईट आहे. कोट्यवधींचे बजेट मंजूर केले जाते. पण पायाभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. - सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

एकाच शाळेत १४ शाळा

ठाणे (पूर्व) येथील शाळा क्रमांक १६ मध्ये तब्बल १४ शाळांचा समावेश आहे. या शाळेतील जवळपास प्रत्येक भिंतीवर पाणी गळती आहे. शाळेची संरक्षक भिंत कधीही पडू शकते, अशा अवस्थेत आहे. मागच्या बाजूस अस्वच्छता आणि भंगार सामान ठेवण्यात आले आहे. भिंतींचे पापुद्रे निघालेले आहेत. शाळेला वर्षानुवर्षे रंगरंगोटी नाही, भिंतींना भेगा, खिडक्यांवर जळमटे आहेत. पावसाचे पाणी आत येते. शाळेच्या वरच्या मजल्यावरील शौचालयांची दारे तुटलेली आहेत. 

मुले, मुली त्याचा वापर करू शकत नाहीत. शौचालयांच्या आजूबाजूला शेवाळ आहे. अनेकदा विद्यार्थी पाय घसरून पडतात. शाळेत स्लॅबचा भाग पडलेला आहे. मुंब्रा स्टेशनजवळील शाळा हे तर प्रचंड उपेक्षेचे आगारच आहे. मुंब्रा बाजारपेठ येथील महापालिकेच्या शाळेत शौचालयाच्या बाजूला हात धुण्यासाठी असलेल्या बेसिनमधून पहिला आणि दुसरा मजल्यावर पाण्याच्या पाइपमधून गळती होते. वर्गाच्या बाहेर पाणी सांडते. मुंब्र्यातील शाळेतील असुविधांची भली मोठी यादी आहे. शाळेच्या आवारात खेळण्यासाठी तयार करण्यात आलेले साहित्य गंजल्याने खराब झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका