ठाणे: वागळे इस्टेट भागातील राजेशकुमार मिश्रा (४३, रा. रूपादेवी पाडा, ठाणे) यांच्याकडील मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या रवी बोध (२५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी रविवारी दिली. त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
राजेशकुमार हा २३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वागळे इस्टेट इंदिरानगर, रूपादेवी पाडा क्रमांक दोन, संजय गांधी मैदानाजवळ जात होते. त्याचवेळी रवि बोध याने त्यांच्या हातातील १५ हजारांचा मोबाइल धक्काबुक्की करीत जबरीने चोरला. हा मोबाइल बोध याने चोरल्याची माहिती पोलिस हवालदार अनिल शेळके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश इथे आणि शेळके आदींच्या पथकाने बोध याला अटक केली.