शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

ठाण्यात दुभाजकाला धडक देत ट्रक उलटला; २७ टनाची कॉईल पडली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:38 PM

घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ एका ट्रकने रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन उलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी त्या ट्रकमधून आॅईल रस्त्यावर पसरल्याने या ट्रकमधील २७ टन वजनाची लोखंडी कॉईल खाली पडली.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने राबविले मदतकार्यचार तास वाहतूक कूर्म गतीने

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ एका ट्रकने रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन उलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी त्या ट्रकमधून आॅईल रस्त्यावर पसरल्याने या ट्रकमधील २७ टन वजनाची लोखंडी कॉईल खाली पडली. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळी या मार्गावर तीन ते चार तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मदत कार्य राबवून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कॉईल उचलण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.किशोर दांगट यांच्या मालकीचा ट्रक त्यांचा चालक कॉईल घेऊन जेएनपीटी येथून घोडबंदर रोडने अहमदाबादकडे जात होता. गायमुख जकात नाक्याजवळ आल्यावर या ट्रकने पहाटेच्या सुमारास एका दुभाजकाला धडक दिली. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रक ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाºया मार्गिकेवर जाऊन उलटला. याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि वाहतूक शाखेच्या कासारवडवली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तातडीने ट्रक आणि त्यातून पडलेली कॉईल हटविण्याचे तसेच रस्त्यावर पसरलेल्या आॅईलवर माती पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले. याचदरम्यान ठाण्याकडून जाणारी वाहतूक ठाण्याकडे येणाºया मार्गिकेवर वळविण्यात आली होती. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पडलेली २७ टनाची कॉईल मोठया क्रेनच्या सहाय्याने अन्य एका ट्रेलरवर ठेवण्यात या पथकांना यश आले. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला होता. धीम्या गतीने वाहतूक सुरु राहिल्याने ती पूर्णपणे बंद नव्हती. परंतू, काही काळ त्याचा परिणाम वाहतूकीवर झाल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. कॉईल उचलण्यात आल्यानंतर वाहतुक दोन्ही मार्गिकेवरून पूर्ववत केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात