कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: येथील नागरी वसाहती मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मर्जिया पठाण या तरुणीने पुढाकार घेतला आहे.वाहतूक नियंत्रणासाठी ती तीच्या सहका-यांसह सातत्याने रस्त्यावर फिरत आहे.सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. यामुळे स्थानिक तसेच शिळफाटा,कल्याणफाटा,तळोजा आदि परीसरातील नागरीक सौदर्य प्रसाधने,नकली दागिने,चपला,कपडे तसेच ईद साठी लागणारा सुकामेवा शेवया आदी वंस्तूच्या खरेदीसाठी मुंब्रा शहरातील अमृत नगर ते कौसा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करत असलेल्या व्यावसायिकांकडे गर्दी करत आहेत.
यामुळे येथील एकमेव प्रमुख (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४) रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.यामुळे वाहनाच्या वेगावर येत असलेल्या मर्यादामूळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून,अनेकदा विशेष करुन रात्रीच्या वेळी येथील स्टेशन ते कौसा दरम्यान असलेले तीन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनांना एक ते दीड तासाचा कालावधी लागतो.यामुळे वाहन चालक कमालीचे त्रस्त होत आहेत.त्यांना दिलासा मिळावा तसेच वाहतूक विना अडढळा व्यवस्थित सुरु रहावी.यासाठी पठाण त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत.