शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

भाईंदरच्या रेल्वे पुलावरून खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळ सापडली 

By धीरज परब | Published: August 08, 2022 10:57 PM

Bhayander : भाईंदरच्या रेल्वे पुलावरून  सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटी जवळ सापडली.

- धीरज परब मीरारोड - भाईंदरच्या रेल्वे पुलावरून  सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटी जवळ सापडली . दलदलीच्या ठिकाणी पहाटे २ च्या सुमारास महिलेचा आवाज ऐकून आधी बोटी वरील मच्छिमारांची बोबडीच वळली . परंतु नंतर ती महिला असल्याची खात्री पटल्यावर तिला बोटीत घेऊन नंतर किनाऱ्यावर आणले . 

भाईंदर खाडी वरील रेल्वे पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व रेल्वे सुरक्षा बल कडून कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याने पुला वरून खाडीत आत्महत्या करण्याच्या व पुलावर गेले असताना खाली पडण्याच्या घटना वाढत आहेत .  काही दिवसां पूर्वीच खाडी पुला वरून खाडीत पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाचवण्यात आले होते . तोच रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास पुला वरून रंजना विश्वकर्मा रा . संतोष भुवन , नालासोपारा हि तरुणी पुला वरून खाडीत पडली . त्यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने नवघर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही . 

दरम्यान वादळी वारे व मुसळधार पाऊस असल्याने उत्तन - चौक भागातील मच्छीमार बोटी किनाऱ्याला आल्या असून चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरण्यात आल्या आहेत . हा भाग अतिशय निर्जन व दलदलीचा असून येथे कोणी चालत सुद्धा जाऊ शकत नाही . चौक जेट्टी वर जायचेच झाले तर लहान बोटीनेच ये - जा करावी लागते . हॉली स्काय बोटीचे मालक ऑलिव्हर बांड्या  व अन्य मच्छिमार , खलाशी हे बोटीवरचा झोपले असताना  रविवारी पहाटे २ च्या सुमारास अचानक एका महिलेचा आवाज येऊ लागला . आवाजाने मच्छीमार उठले व खरंच महिलेचा आवाज येतोय का ? अशी एकमेकास विचारणा करू लागले . आवाज महिलेचा असल्याची खात्री होताच आजूबाजूला लाईट पाहणी केली असता त्यांच्या लहान बोटीतून खरंच हाक मारणारी महिला दिसली . आधी तर सर्वांची भुताटकी वाटून बोबडीच वळली . 

पण नंतर धीर धरून त्या महिलेस विचारणा करत तिचे फोटो व छायाचित्रण करून मच्छिमार नेते बर्नड डिमेलो याना पाठवले . त्यांनी उत्तन सागरी पोलिसांना कळवले . मच्छीमारांनी महिलेस चहा दिला व कपडे दिले . भरती आल्यावर लहान बोटीने तिला  जेट्टीवर आणून उत्तन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले . पोलिसांनी नंतर त्या महिलेचा प्राथमिक जबाब घेऊन नवघर पोलिसां कडे सोपवले . पोलिसांनी तिला तिच्या परिचितां कडे सुपूर्द केले असून खाडीत पडल्या नंतर ती पाण्याच्या प्रवाहात वाहत नंतर खाडी किनाऱ्याच्या चिखलात अडकली . मच्छिमारांच्या बोटी वरील विजेचे दिवे पाहून ती चिखल तुडवत कशीबशी तिथे पोहचली असे सांगण्यात आले . तिचा भाऊ काही महिन्या पूर्वी खाडी पुलावरून पडून मरण पावल्याने ती मैत्रिणीसह पुलावर आली होती .  

टॅग्स :bhayandarभाइंदर