शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तरुण पिढीने राजा रविवर्मा समजून घेतला पाहिजे - ज्येष्ठ चित्रकार नीलिमा कढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 3:19 PM

ठाण्यातील हजुरी परिसरातील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेने भरवलेल्या राजा रविवर्मा यांच्यावरील चित्रप्रदर्शनात राजा रविवर्मा यांच्या चित्रशैली बद्दल बोलण्यासाठी आज ठाणे स्कूल ऑफ आर्ट्सच्या संचालिका कढे उपस्थित होत्या.  

ठाणे : चित्र हे सर्वांनाच परवडणारे माध्यम नसलेल्या काळात जनसामान्यांपर्यंत चित्रकला पोचविण्यासाठी राजा रविवर्मा यांनी मूलगामी प्रयत्न केले. त्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती छापण्यासाठी  लोणावळ्याजवळील मळवली येथे चित्रांचा कारखाना सुरू केला. पाश्चात्त्य वास्तववादी चित्रकला व भारतीय पुराणांमधील पात्र यांचा सुंदर मिलाफ राजा रविवर्मा यांच्या चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो असे मत ज्येष्ठ चित्रकार नीलिमा कढे यांनी व्यक्त केले. 

ठाण्यातील हजुरी परिसरातील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेने भरवलेल्या राजा रविवर्मा यांच्यावरील चित्रप्रदर्शनात राजा रविवर्मा यांच्या चित्रशैली बद्दल बोलण्यासाठी आज ठाणे स्कूल ऑफ आर्ट्सच्या संचालिका कढे उपस्थित होत्या.  यावेळी त्यांनी राजा रविवर्मा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर व प्रदर्शन समन्वयक डॉ महेश बेडेकर यांचे  कौतुक केले. याप्रसंगी ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात लावलेल्या चित्रांमधून प्रेरणा घेऊन स्वतः कॅनव्हासवर वेगवेगळी चित्र काढून या प्रदर्शनात रंगत आणली. मोबाईल टेलिव्हिजन व समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरातून पुढच्या पिढीला सोडवणे हे आव्हान असून कलेच्या माध्यमातून त्यांना भारतीय परंपरांशी जोडण्यासाठी राजा रविवर्मा एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. त्यासाठी तरुण पिढीने राजा रविवर्मा यांची चित्रे समजून घेतली पाहिजेत असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी त्यांची मुलाखत डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी घेतली. १९८६ मध्ये स्थापन झालेली ठाणे स्कूल ऑफ आर्ट  ही संस्था  चित्रकलेतील अनेक अभ्यासक्रम तयार करून  फाईन आर्ट्स अप्लाइड आर्ट शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते . या संस्थेत अडीचशे विद्यार्थी शिकतात. ७ मे पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी  केले आहे.