सदानंद नाईक
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगरुळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी झाल्याची घटना उघड झाली. चोरट्याने स्टेथोस्कोप, बीपी मोजण्याची मशीन, कात्री, कटर आदी साहित्य लंपास केले असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगरुळ गावात प्राथमिक आरोग्य केंद्र (दवाखाना) आहे. शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी अज्ञात चोरट्याने दवाखान्यात प्रवेश करून डॉक्टर वापरात असलेला स्टेथोस्कोप, रक्तदाब मोजण्याची मशीन, कात्री, कटर, जुने प्रिंटर, वजन काटा, इन्व्हर्टर बॅटरी, लोखंडी स्टूल अश्या एकून १४ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. चोरीचा प्रकार सोमवारी उघड झाल्यावर दवाखान्याचे डॉ मनोज भिसे यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, अधिक तपास पोलीस करीत असून या चोरीच्या प्रकारची चर्चा परिसरात होत आहे.