लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेटमधील अंबिकानगर भागातील फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चोरी करणाऱ्या नितीन कांबळे (३१, रा. इंदिरानगर) आणि रामचंद्र जैस्वार (४९, रा. हनुमाननगर) या दोन कामगारांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील सर्व ४८ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनीअर्स कंपनीतून ३० डिसेंबर २०२१ ला रात्री ८.३० ते २ जानेवारी २०२२ ला सकाळी ८.३० च्या दरम्यान २८ हजारांचे (२८ किलो) पीवी टू बुश बेअरिंग पार्ट्स तसेच २० हजारांचे स्लायडिंग बॉडी पॅकिंग प्लेट (२० किलो) चोरीला गेले होते. या प्रकरणी कंपनीचे अधिकारी जयप्रकाश सिंग यांनी ३ जानेवारीला वागळे इस्टेट पोलिसांत गुन्हा नोंदविला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ, पोलीस हवालदार चंद्रकांत वाळुंज, पोलीस नाईक रोहन जाधव, दीपक बरले आणि रत्नदीप शेलार आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे याच कंपनीतील नितीन आणि रामचंद्र या कामगारांना ३ जानेवारीला रात्री अटक केली. त्यांनी या चोरीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीतील सर्व ४८ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
फॉरवर्ड प्रेसिजन कंपनीत चोरी; दोन कामगारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 12:26 AM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वागळे इस्टेटमधील अंबिकानगर भागातील फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चोरी करणाऱ्या नितीन ...
ठळक मुद्देसीसीटीव्हीमुळे जाळ्यातवागळे इस्टेट पोलिसांची कारवाई